NEWS

ॲटलास कोप्‍को पुण्‍यातील नवीन फॅक्‍टरीसह भारतातील उत्‍पादनामध्‍ये वाढ करणार

Share Post

ॲटलास कोप्‍को ग्रुप या कम्‍प्रेसर्स, व्‍हॅक्‍यूम सोल्‍यूशन्‍स, जनरेटर्स, पंप्‍स, पॉवर टूल्‍स व असेम्‍ब्‍ली सिस्‍टम्‍समधील अग्रणी कंपनीने तळेगाव, पुणे येथे त्‍यांच्‍या नवीन उत्‍पादन केंद्राच्‍या बांधकामाला सुरूवात केली आहे. अॅटलास कोप्‍कोची तळेगावमधील नवीन अत्‍याधुनिक एअर व गॅस कम्‍प्रेसर सिस्‍टम फॅक्‍टरी स्‍थानिक बाजारपेठेसाठी, तसेच निर्यातीसाठी देखील सिस्‍टम्‍सचे उत्‍पादन करेल. या फॅक्‍टरीमध्‍ये जवळपास २७०.००० चौरस फूट जागेवर उत्‍पादन प्‍लांट आणि कार्यालयीन इमारत असणार आहे. या प्रकल्‍पासाठी नियोजित गुंतवणूक १४०० दशलक्ष रूपये (जवळपास १५.० दशलक्ष युरो) आहे. नवीन केंद्राचे बांधकाम २०२४ च्‍या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्‍याची अपेक्षा आहे. या केंद्रामुळे २०० हून अधिक व्‍यक्‍तींसाठी अतिरिक्‍त रोजगार निर्माण होईल आणि उत्‍पादन क्षमतेत वाढ होईल. ऑईल-फ्री एअर डिव्हिजनचे अध्‍यक्ष फिलिप अर्नेन्‍स या नवीन केंद्राच्‍या घोषणेबाबत आपले मत व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”आम्‍ही भारतीय व निर्यात बाजारपेठांच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी भारतातील क्षमतेमध्‍ये अधिक गुंतवणूक करत आहोत. हा विस्‍तारीकरण प्रकल्‍प आमच्‍या ग्राहकांच्‍या मनात पहिली, निवडीमध्‍ये पहिली कंपनी म्‍हणून कायम राहण्‍यासाठी आमच्‍या धोरणाचा भाग आहे. हा प्रकल्‍प आम्‍हाला नवीन ग्राहक व बाजारपेठांपर्यंत पोहोचण्‍यास सक्षम करेल आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍याच्‍या वेळेत सुधारणा करेल.” अॅटलास कोप्‍को इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे उपाध्‍यक्ष मार्कलो कबिलिओ म्‍हणाले, ”अॅटलास कोप्‍को कार्बनचे प्रमाण कमी करणारे शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी राहिली आहे. ही फॅक्‍टरी या उपक्रमांना कायम ठेवते. या नवीन फॅक्‍टरीमध्‍ये ही नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने डिझाइन व निर्माण करण्‍यामध्‍ये सामील असलेल्‍या आमच्‍या उत्‍कट टीम्‍स ग्राहकांच्‍या उत्‍पादकता व शाश्‍वतता ध्येयांना पाठिंबा देण्‍यामध्‍ये साह्य करतील.” तळेगाव येथील केंद्रामध्‍ये जवळपास ८० टक्‍के ऊर्जा सौर ऊर्जेमधून निर्माण केली जाईल आणि वापरले जाणारे तीन-चतुर्थांश पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगमधून घेतले जाईल. नवीकरणीय स्रोतांचा वापर करत या दृष्टीकोनाचा कार्यक्षमता वाढवण्‍याचा, कार्यसंचालन व देखभाल खर्च कमी करण्‍याचा आणि समकालीन ऊर्जा व पाणी पुरवठ्यांवरील अवलंबन कमी करण्‍याचा उद्देश आहे. अॅटलास कोप्‍कोचा अधिक शाश्‍वत पद्धतीने त्‍यांच्‍या नवीन केंद्रांचे बांधकाम करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे बांधकामापासून ताबा मिळण्‍यापर्यंत विविध पैलूंचे निराकरण होईल. लीन, सेफ, एर्गोनॉमिक, फ्लेक्झिबल व सर्क्‍युलर उत्‍पादन तत्त्वांच्‍या अनुषंगाने या फॅक्‍टरीचे बांधकाम करण्‍यात येईल. ही तत्त्वे रीड्यूस, रियूज व रिसायकल या मुलभूत पैलूंमध्‍ये खोलवर रूजलेली आहेत, ज्‍यांचा पर्यावरणीय प्रभावांना सानुकूल करण्‍याचा मनसुबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *