३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या कु. पुर्वी गांजवे सत्कार
पणजी, गोवा येथे सुरु असलेल्या ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकवणाऱ्या कु.पुर्वी गांजवे हिचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे तर्फे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
महाराष्ट्र टिम कडुन खेळणारी कु.पुर्वी राहुल गांजवे ही पिंच्याक सिलॅट खेळाची राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक असुन खेलो इंडियाची गोल्ड मेडलिस्ट आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक किशोर येवले सर यांनी टीमला मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत ७ सुवर्ण ५ रौप्य ५ कांस्य एकुन १७ पदकाची कमाई करुन महाराष्ट्राचे अव्वल स्थान अबाधित ठेवले.
या स्पर्धेत २८ राज्यांमधील ३१४ खेळाडुंची निवड झाली होती.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण गोविंद गावडे क्रिडामंत्री,गोवा, इंडियन ऑलिंपिक असोसिएशन शहदेव यादव, अभिताप शर्मा, योगेश्वर दत्त,ऑलिंपिकचे महासचिव नामदेव शिरगावकर, इंडियन पिंच्याक सिलॅट असोसिएशन अध्यक्ष किशोर येवले ह्यांच्या हस्ते झाला.