29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

३४व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मल्लखांब स्पर्धेस सुरुवात

Share Post

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र जिल्हा मल्लखांब असोसिएशन तर्फे महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या मल्लखांब
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. ३ सप्टे. रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र मंडळ, टिळक रोड येथे संपन्न
झाले.

यामध्ये ८ वर्षे ते २० वर्षे वयोगटातील ३०० पेक्षा जास्त मुले व मुली सहभागी झालेल्या असून १२
गटांमधील हा स्पर्धा पार पडत आहेत. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी मल्लखांब स्पर्धेचा
खांबाला पुष्पहार अर्पण करून व नारळ वाढवून स्पर्धेचा प्रारंभ केला. यावेळी सौ. मीरा कलमाडी, पुणे
फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले, महाराष्ट्र जिल्हा मल्लखांब
असोसिएशनचे सचिव अभिजित भोसले आणि महाराष्ट्र मंडळाचे फिजिकल डायरेक्टर सचिन परदेशी उपस्थित
होते. नेहा दामले व रोहन दामले यांनी सर्वांचे स्वागत केले. या स्पर्धांची अंतिम फेरी रविवार दि. ४ सप्टे.
रोजी पार पडणार असून याचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ४ सप्टे. रोजी सायं. ५.०० वाजता  संपन्न
होईल.