29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये; पार पडला दिमाखदार केरळ महोत्सव !

Share Post

पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 34 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दि. ४ सप्टे. रोजी सायं. ५.३० वाजता केरळ महोत्सव साजरा  झाला . यंदा या महोत्सवाचे २५वे वर्ष आहे . यानिमित्त केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण व  फुकलम(फुलांची रांगोळी) यांनी बालगंधर्व रंगमंदिर सजवले गेले होते . दीपप्रज्वलन करून केरळ महोत्सवची सुरुवात झाली.

केरळ महोत्सवात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचा विशेष सत्कार पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे फेस्टिव्हलमध्ये सलग २५ वर्षे केरळ महोत्सव होत असून त्याबद्दल आनंद व कृतज्ञता राजन नायर यांनी व्यक्त केली आणि ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांच्यामध्ये कला संस्कृती नृत्य गायन या द्वारे प्रेम बंधुत्व वाढविण्याची शिकवण व प्रेरणा पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडींनी आम्हाला दिली त्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

याप्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हेही उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की महारष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी चालना मिळाली असून पुणे फेस्टिव्हल सारख्या मोठ्या सांस्कृतिक महोत्सवामुळे पर्यटनवाढीस मदत होते. या प्रसंगी  सौ मीरा कलमाडी,  पुणे मल्याळी फेडरेशनचे को – ऑर्डिनेटर बाबु नायर,  पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल ,मुख्य संयोजक डॉ सतीश देसाई, काका धर्मावत ,मोहन टिल्लू ,श्रीकांत कांबळे उपस्थित होते.   

 भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, फ्युजन डान्स, क्लासिकल डान्स, कैकोटीकली, मार्गमकली आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.