29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

२२ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन व “तेजस्वीनी” पुरस्कार प्रदान !!

Share Post

“यादेवी सर्व भुतेषु, शक्ति रूपेण संस्थिता” अशी ‘ती’ म्हणजे स्त्री तीचा हा सन्मान करण्यात आला निमित्त होते ते, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे! त्यात भाग्यलक्ष्मी स्पर्धा २०२२ च्या अंतर्गत पुणे नवरात्रौ महिला महोत्सव या  सोहळ्याचे अतिशय दिमाखदार उद्घाटन झाले प्रारंभी  सर्वांनी लक्ष्मी मातेचे मादिर्त जाऊन दर्शन घेतले त्यानंतर दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.

जेष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होत्या. तेजस्विनी पुरस्काराच्या मानकरी जेष्ठ गायिका अनुराधा मराठे ,मोडेलिंग -ग्रुमिंगतज्ञ जुई सुहास आणि बाल अभिनेत्री सह्याद्री क्रांती मळेगांवकर त्यांना या प्रसंगी तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५००० रुपये रोख ,देवीची प्रतिमा ,सन्मानचिन्ह ,शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक, अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यावेळी मंचावर उपस्थित होते .त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती शंखनादासह झाली. संडी ग्रुपच्या कलाकारांनी अतिशय उत्तम नृत्य अविष्कारा सह देवीचा गोंधळ आणि गणेश वंदना सादर केली त्या वेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा उत्तम कडकडाट केला.

महिला महोत्सवाचा  अध्यक्षा जयश्री बागुल यांनी स्वागत केले,प्रारंभी त्यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा २८ सप्टे हा जन्मदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या  स्मृतींना  वंदन करून त्या म्हणाल्या की,  स्त्री ला संधी मिळाली की ती संधीचे सोने करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे लता दीदी आहेत .आपल्या लक्ष्मी माता मंदिरात त्यांनी आरती केली व पसयाद्नही म्हणले. लता दीदींच्या प्रमाणेच राष्ट्रपती द्रृपदी मुर्मू यांनी महिलांना नवा आदर्श घालून दिला आहे . ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी ’ ही म्हण सर्वार्थाने खरी असून समजतील स्त्री चा सन्मान वाढला पाहिजे , वाडे , इमारती वस्त्या या सर्वांमध्ये महिला महोत्सव आयोजित केले पाहिजे असे त्या म्हणाल्या .

त्यानंतर प्रास्ताविक आबा बागुल यांनी मनोगते व्यक्त केली. ते म्हणाले की ‘’स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’’ या म्हणीचा उल्लेख करून पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक , अध्यक्ष आबा बागुल म्हणाले की ,नारी शक्ती ही मोठी प्रभावी शक्ती आहे ,तरी मधील कला गुणांना आणि कर्तृत्वाला समाजात संधी मिळालीच पाहिजे त्यासाठी असे महिला महोत्सव उपयोगी पडतात.गेल्या २२ वर्षात पुणे नवरात्रौ महिला  महोत्सवात हजारो भगिनींनी भाग घेतला त्यांचा आत्मविश्वास वाढला ,या बद्दल  महिला महोत्सवाचा  अध्यक्षा जयश्री बागुल आणि सर्व महोत्सवात सहभागी सर्व भगिनींचे कौतुक करतो या महिला महोत्सवाचे आयोजन आणि प्रचंड प्रतिसाद ही सारी लक्ष्मी मातेचीह्क कृपा आहे असे आबा बागुल म्हणाले.