20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

२०२६ पर्यंत ५ वीं आर्थिक महसत्ता म्हणून भारताचा उदय खासदार संजय सेठ यांचे विचार

Share Post

मंदीच्या काळानंतर भारतात १ लाख ३० हजार कोटींचा जीएसटी जमा झाला होता. आता हा जीएसटी १ लाख ५४ हजार कोटी पर्यंत जमा होतांना देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत भारत संपूर्ण विश्वात ५वीं आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल,”असे विचार झारखंड येथील रांचीचे खासदार संजय सेठ यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतिने आयोजित मास्टर इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट (एमपीजी)१८ व्या बॅच च्या शुुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी राज्यसभा सदस्य डोला सेन, राज्य सभा सदस्य गुलाम अली खताना विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड होते.
तसेच यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन व प्रा. परिमल माया सुधाकर उपस्थित होते.


संजय सेठ म्हणाले ,“ राष्ट्रभाव, दूरदृष्टी, आणि भाषेवर नियंत्रण हे गुण राजकारणात येतांना अंगी बाळगावे. पण तत्पूर्वी समाजकारणात प्रवेश करावा. वर्तमानकाळात राजकारणाची परिभाषा बदलतांना दिसत आहे. पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक मोठ्या प्रमाणात होते परंतू आता सुशिक्षीत युवकांची संख्या वाढली आहे. राजकीय क्षेत्रात तुलनात्मक अध्ययन करण्याची सवय लावून घ्यावी.”
गुलाम अली खताना म्हणाले,“युवकांना राजकारणात नाही लोकतंत्रला सशक्त करण्यासाठी यावे लागेल. येथे आल्यावर लक्ष्य निर्धारित करून त्या दिशेने स्वतःला झोकून घ्यावे. लोकशाहीमध्ये कोणताही व्यक्ती गोंधळला जाणार नाही असे कार्य करावे. युवकांनी राजकारणाचे प्रशिक्षण घेतांना शिक्षणाची कॉपी न करता आपल्या पॅशन नुसार कार्य करावे. नेता बनल्या नंतर जनतेशी सदैव संवाद साधत रहावे.”
डोला सेन म्हणाल्या ,“जनता, समाज आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी चांगल्या सुशिक्षित व्यक्तींनी राजकारणात यावे. वाढत जाणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशिक्षित राजकारणी लोकांची गरज आहे. येथील गरीबी, उपसमार, लहान मुलांची समस्या सोडण्यासाठी सर्वांनी समोर यावे.”


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“आजदी के अमृत महोत्सव च्या काळात देशाची स्थिती बदलण्याची गरज आहे. राजकारणात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जावा यासाठी भर देण्याची गरज आहे. वर्तमानकाळात राजकारणावर संशोधन करण्याची वेळ आली आहे. २००५ मध्ये सुरू केलेल्या या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. हेच आमचे यशाचे गमक आहे.”
परिमल माया सुधाकर यांनी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली. तसेच राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात देशात प्रथमच राष्ट्रीय विधायक परिषदेचे आयोजन करण्याचा उद्देश्य सांगितले. राजकारणात चांगले व्यक्ती येण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थी के सूजाता व शिवम कोटियाल यांनी विचार मांडले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले.
प्रा.डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.