26/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

१२वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे येथे

Share Post

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.
बाराव्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. या समारंभासाठी भारत सरकारच्या कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

MIT

MIT


बिहारचे विरोधी पक्ष नेते व माजी सभापती विजय कुमार सिन्हा, इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, हरित कार्यकर्ता आणि हिमालयन पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता या संसदेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या माजी अध्यक्ष डॉ. मिरा कुमार या अध्यक्षिय भाषण देणार आहेत. तसेच लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण श्रीमती सुमित्रा महाजन सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.ए. माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, इतिहासकार, लेखक, आर्थिक विश्लेषक डॉ. विक्रम संपत , एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, हे उपस्थित राहणार आहेत.
छात्र संसदेचेया उद्घाटन व समारोप समारंभा खेरीज या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली आहे.
पहिले सत्र गुरुवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सुरू होणार आहे. भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे? या विषयावर राष्ट्रीय कॉग्रेस कमिटीचे सहसचिव अ‍ॅड. कृष्णा अलवारू व सिबीआयचे माजी संचालक डी.आर. कार्तिकेयन हे आपले विचार मांडतील. उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतिश महाना हे अध्यक्षपदी असतील.
यावेळी ओडिसाचे गृहराज्यमंत्री तुषार कांती बेहरा, हिमाचल प्रदेशचे आमदार श्रीमती रेना कश्यप यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने तसेच, आध्यात्मिक गुरू पूज्य श्री. इंद्रेश उपाध्याय यांना युवा अध्यात्मिक गुरू पुरस्काराने गौरविण्यात येईल.
भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आर्थिक दृष्या भारत जगाचे नेतृत्व करेल. याविषयावर विशेष भाषण होईल.


दुसरे सत्र शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा.सुरू होणार आहे. घराणेशाही- प्रत्येक राजकीय पक्षाचे कटू सत्य ? या विषयावर राज्यसभेचे खासदार राघव चड्डा, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्रीमती भारतीय घोष आणि सुप्रसिद्ध पत्रकार रशिद किडवाई हे विचार मांडतील. लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. मिरा कुमार या अध्यक्षस्थानी असतील. तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
राजस्थान विधानसभेचे सभापती डॉ. सी.पी.जोशी यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने गौरविण्यात येईल.
तिसरे सत्र शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वा. सुरू होणार आहे. लोकशाही आणि कॉर्पोरेटशाही- सत्ता कोणाकडेे? या विषयावर राज्यसभेचे खासदार संजय सिंग, सोशल आणि डिजिटल मिडियाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनाथे, प्रसिद्ध पत्रकार, लेखक परंजॉय गुहा ठाकुर्ता, राष्ट्रीय संस्कृती विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण एन.गोपाला स्वामी हे विचार मांडतील. हरियाणा विधानसभेचे सभापती ज्ञानचॉद गुप्ता हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच उत्तरप्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सुरेश कुमार खन्ना हे उद्घाटनपर भाषण करतील.
यावेळी मध्यप्रदेश आमदार डॉ. हिरालाला अलावा, पॉडिचेरीचे आमदार रायचंद जोहन कुमार आणि उत्तरप्रदेशचे आमदार डॉ. रागिनी सोनकर यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येईल.

भारतीय छात्र संसदेविषयी :
तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतीकारक बदल घडवून आणणे, राष्ट्र व समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे, या हेतूने २०११ मध्ये भारतीय छात्र संसदेचा प्रारंभ झाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक प्रा. राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्पक व समन्वयक आहेत. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या नवव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्टये :

-२९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.
-२०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग.

  • भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.
  • भारतातील ६ राज्यातील संसदीय कार्यमंत्र्यांचा सहभाग.
  • भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगुरूंचा सहभाग
  • निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार.
  • आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.
  • आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत.
    अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. रवी. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपन पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, डॉ. प्रसाद खांडेकर, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन व प्रा. सुधाकर परिमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.