23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

हिंदी हास्य कवी संमेलनात भिजून चिंब झाले पुणेकर रसिक

Share Post

तब्बल दोन वर्षाच्या कोरोना सावटानंतर शनिवारी पुणे फेस्टिवल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदी हास्य कवी संमेलनामध्ये हास्याचे फवारे आणि टाळ्यांचा कडकडात अनुभवायला मिळाला. शाब्दिक कोट्या आणि विनोदी रचना सादर करत या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या कवींनी रसिकांना चिंब केले.

३४ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत हिंदी विनोदी काव्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सुभाष काबरा, आशकरण अटल, डॉ. मुकेश गौतम, महेश दुबे, राजेंद्र मालविय, सुमिता केशवा या कवींनी दैनंदिन जीवनातील किस्से, त्यावर रचलेल्या रचना, पती आणि पत्नी मधील संबंधांवर केलेल्या कोट्या, विनोद आणि सादर केलेल्या रचना यांनी रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत दाद दिली.  खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी याचे संयोजन केले होते. महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी आणि महाराष्ट्रीयन उत्तर भारतीय एकता मंचचे सदस्य मुबेम संस्था यांचा सहयोग यास लाभला.कोरोनाच्या सावाटामुळे दोन वर्षे पुणे फेस्टिवल झाला नाही. याचा सर्वांनीच उल्लेख करत त्यावरील रचनाही सादर केल्या.

मुकेश गौतम यांनी सादर केलेल्या

                            गुजर  रही थी जिंदगी ऐसे मुकाम से

                            अपने ही दूर भागते थे जरासे जुखाम से..

                            क्या बताएं दर्द ए दिल, किस हाल मे हम जी रहे थे

                            गिलास था रेड लेबल का और हम हल्दी पी रहे थे….

या रचनेला रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली. 

सुमिता केशवा यांनी

                    जिंदगी तुझसे समझोता कितना किया जाय

                    शौक इतना भी नही की मर मर के जिया जाय..

आणि   

                     जो हसा उसका घर बसा

                      मगर जिसका घर बसा

                      उसको पुछो कब हसा..     

या रचनांना रसिकांची दाद

                     शादी तो ऐसी जंग है सुनो मेरे साथी,

                     चोट लगने से पहले सभी हल्दी लगाते है..

या त्यांच्या लग्नावरील रचनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,

महेश दुबे यांनी

माणूस निष्कारण कशी काळजी करतो किंवा समस्या आली तरी नक्की खरी समस्या काय हे त्याला’च कसे समजत नाही यावर विनोदी कोट्या आणि रचना सादर केल्या.

राजेंद्र मालविय यांनी सादर केलेल्या

                              जीवन के आपाधापी मे

                              खुशियों के कुछ  पल मिलते है..   

                              ऊनको खुशी मे जि लेना..

                              ये मत कहो कल मिलते है..

या रचनेला रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यांनी सादर केलेल्या लग्नानंतर पत्नीला वैतागल्यानंतर ‘फिमेल’ या शब्दाचा तिटकारा आल्यानंतर बोलतानाही एखादा स्त्रीलिंगी शब्द आला तरी त्याचा उच्चार ते पुरुषार्थी कसा करतात आणि त्यातून निर्माण होणारे विनोद यांच्या रचनांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

आशकरण अटल यांनीही जीवनातील अनेक घटनांवर आधारित विनोदी रचना आणि त्यातून विचार करायला लावणाऱ्या रचना सादर केल्या.

सुभाष काबरा यांनी त्यांच्या नेहेमीच्या विनोदी शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकीपटू व भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णदार पद्मश्री धनराज पिल्ले, दैनिक आज का आनंद चे संपादक आनंद अग्रवाल आणि न्याती बिल्डर्सचे नितीन न्याती हे उपस्थित होते. पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृषणकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, अॅड.  अभय छाजेड, नगरसेवक राफीकभाई शेख, काका धर्मावत, संतोष उणेचा, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते प्रमुख अतिथि आणि कविंचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार संगीता तिवारी यांनी मानले