हिंदीला सन्मान देण्याचा सरकारी पातळीवर पहिल्यांदाच प्रयत्न
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हिंदीला सन्मान देण्याचे काम सरकारी पातळीवर झाले आहे. भाषेबाबत राजकारण करणाऱ्यांमुळे हिंदीला इतर भाषांशी समन्वय साधता आला नाही. आता 2021 पासून हिंदीबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हिंदी दिनही मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला आहे असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या तिसऱ्या भारतीय राजभाषा परिषदेत केले. यावेळी व्यासपीठावर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, संसदीय राजभाषा समितीचे उपाध्यक्ष भर्तहरी महताब, राज्यसभा खासदार राकेश सिन्हा, वैज्ञानिक व तांत्रिक शब्दावली आयोगाचे अध्यक्ष प्रा. गिरीशनाथ झा, राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्य, सहसचिव डॉ.मीनाक्षी जॉली आदी उपस्थित होते.
आपण सर्वजण बर्याच काळापासून दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिन साजरा करत आहोत, परंतु आज अखिल भारतीय राजभाषा परिषद तिसऱ्यांदा हा कार्यक्रम आयोजित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांचेच हे फळ आहे कि तो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 2021 नंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना पहिल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हिंदी दिनानिमित्त अजय मिश्रा यांनी शुभेच्छाही दिल्या.त्याच वेळी, गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने आपल्या विविध उपक्रमांद्वारे हिंदीचा केवळ राजभाषेशीच नव्हे तर सर्व भारतीय भाषांशी सुसंवाद साधला जावा या दृष्टिकोनातून, खूप मेहनत घेतली आहे आणि खूप चांगले फलितही मिळाले आहे. हा कार्यक्रम ज्या प्रकारे आयोजित केला आहे त्याबद्दल राजभाषा विभागाच्या सचिव आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे त्यांनी अभिनंदन केले.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, हा देश शिक्षणाचा, सांस्कृतिक ज्ञानाचा आणि मूल्यांचा देश आहे. आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात.आपल्या हिंदी आणि भारतीय भाषा यांच्यात कधीच स्पर्धा नव्हती. या देशाला सर्व भाषांमधील साहित्य आणि ज्ञानाची परंपरा आहे आणि या सर्व भाषांना अतिशय समृद्ध भाषा म्हणून स्वतःची ओळख आहे.
आपल्याकडे जी 20 चे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी गृहमंत्र्यांनी संसदीय राजभाषा समितीची बैठकही घेतली होती. या बैठकीत आपल्याला गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकायच्या आहेत. आपली संस्कृती, आपली भाषा यांना गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण काम केले पाहिजे, यासह पंच प्रण शपथ घेण्यात आली.याची प्रचीती आपल्याला जी-20 परिषदेत पाहायला मिळाली . जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान जेव्हा हिंदीत भाषण करत होते, तेव्हा वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतराची व्यवस्था होती, पण त्या परिषदेत उपस्थित अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह अनेक लोक पंतप्रधानांचे हिंदीतील भाषण अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते.जी -20 मधील अनेकांनी काही हिंदी शब्दात पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.