23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

हिंदवी स्वराज्य महोत्सव: विक्रमी 11000 शिवप्रेमींच्या उपस्थितीत महाआरती सोहळा संपन्न

Share Post

.राज्यातील तमाम 11000 शिवप्रेमींच्या उपस्थितीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शिवप्रेमींच्या विक्रमी उपस्थितीत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रविवारी शिवनेरी गडाच्या पायथ्याजवळ शिवाजी महाराजांची महाआरती पार पडली. यादरम्यान उपस्थित शिवप्रेमींच्या पाठबळामुळे हा महोत्सव लक्षवेधी ठरला.महाराष्ट्रातील प्रसिद्ध जाणता राजा या कार्यक्रमातील कलाकारांनी शिवकालीन संस्कृतीला उजाळा देत तमाम उपस्थित शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पर्यटन विभागाचा हा सोहळा मराठी माणसांसाठी शिवकालीन संस्कृतीचे जतन करणारा ठरला. पर्यटन विभागाच्या पाठबळामुळे या ठिकाणी शिवकालीन बाजारपेठही सजवण्यात आली होती. शनिवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान गडाच्या पायथ्याजवळ बचत गटांच्या विविध स्टॉलचे ही प्रदर्शन भरवण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी लोकप्रिय दिग्दर्शक अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम ही उपस्थित शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरला.रविवारी सकाळपासून जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मान्यवरांच्या उपस्थितीत शिव वंदना हा कार्यक्रम पार पडला. तसेच संध्याकाळी ६.१५ ते ७ वाजे दरम्यान पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ महाराजांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर लोकप्रसिद्ध जाणता राजा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सोहळ्यादरम्यान सहभागी कलाकारांनी शिवकालीन जिवंत इतिहास उपस्थित शिवप्रेमींच्या समोर उभा केला.या तीन दिवसीय हिंदवी स्वराज्य महोत्सवा दरम्यान महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना कला आणि शिल्प मेळावा संगीत उत्सव पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवकालीन गावांचा अनुभव घेता आला.टेंट सिटी व पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांच्या सहभागमुळे मोठी पर्वणी लाभली. प्रधान सचिव पर्यटन विभाग सौरभ विजय, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पर्यटन संचालनालय संचालक डॉ. बी एन पाटील यांनी यांनी अथक परिश्रमातून या महोत्सवादरम्यान शिवप्रेमींना शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडवून आणले.