18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

हातावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्यात सह्याद्रि हॉस्पिटल्स’मध्ये प्रगत विभाग सुरू

Share Post

हात, मनगट, कोपर व ख्यांद्याच्या दुखापतींवर विशेष उपचारांसाठी पुण्यातील ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’ने ‘प्रगत हँड सर्जरी विभाग’ सुरू केला आहे. हातासंबंधी कोणत्याही आजाराने वा दुखापतीने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर एकात्मिक स्वरुपात विशेष तज्ज्ञांकडून उपचार करून त्यांना दिलासा देणे, हा हे केंद्र सुरू करण्यामागील सह्याद्रि हॉस्पिटल्सचा उद्देश आहे.

इमेजिंग व सर्जिकलसंबंधित प्रगत तंत्रांचा वापर या केंद्रामध्ये करण्यात येईल. त्यामुळे अचूक निदान, काटेकोर उपचार, कमीतकमी चीरफाड आणि योग्य तो परिणाम या गोष्टी साध्य होऊ शकतील. या केंद्रामध्ये आपत्कालीन उपचार, सांधे पुनर्बांधणी, लहान सांध्यांची आर्थ्रोस्कोपी, हाडांचे प्रत्यारोपण, टेंडन व लिगामेंट यांची पुनर्रचना, जन्मजात दोष निवारणासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, सतत हालचालींमुळे उद्भवणाऱ्या दुखापतींवर उपचार, मज्जातंतूंची दुरुस्ती आणि इतर अत्याधुनिक तंत्र असे अनेक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील.

या विभागामध्ये शरीराच्या वरच्या अवयवांच्या पुनर्वसनात मदत करण्यासाठी ‘ऑक्युपेशनल थेरपिस्ट’ आणि ‘फिजिकल थेरपिस्ट’ यांच्याद्वारे रुग्णांना विशेष हँड थेरपीदेखील देण्यात येईल. हँड थेरपीमध्ये हाताच्या इजा रोखणे, हाताच्या हालचाली सुरळीत करणे आणि दैनंदिन जीवनात हातांची कार्यक्षमता वाढवणे यांवर भर देण्यात येतो. पुनर्वसनाच्या सेवांमध्ये शस्त्रक्रियेनंतरची काळजी, वेदनांचे व्यवस्थापन, संवेदना जागृत करणे, व्यायाम, कृत्रिम आधार आणि इतर काही उपचार समाविष्ट असणार आहेत.

हॅंड सर्जरी विभागाच्या उद्घाटनप्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्स’च्या प्रगत हात शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व वरिष्ठ तज्ञ डॉ. अभिजीत वाहेगावकर म्हणाले, “सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये प्रगत हात शस्त्रक्रिया विभाग सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या पथकात पाच अत्यंत कुशल व उच्च-प्रशिक्षित असे हँड सर्जन सहभागी आहेत. आमच्या सर्व रूग्णांना सर्वांगीण व उत्तम दर्जाचे उपचार देण्यास ते समर्थ आहेत. मानवी हात किती महत्त्वाचे असतात, हे शब्दांत सांगता येत नाही. अशा या अति-महत्त्वाच्या अंगाची विशेष काळजी घेण्यासाठी व रुग्णांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आमचा विभाग समर्पित आहे. नावीन्यता, बहु-अनुशासनात्मक सहयोग आणि दयाळू बुद्धीने रुग्ण-केंद्रित काळजी यांवर आमचा भर आहे. उपचार आणि पुनर्वसन यांचा हा प्रवास सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी डॉसुनील राव या प्रसंगी म्हणाले, प्रगत हँड सर्जरी विभाग सुरू करून आम्ही आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या सीमांपलिकडे नेण्यास सह्याद्रि हॉस्पिटल्स कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले आहेअत्याधुनिक तंत्रज्ञान  सर्वसमावेशक दृष्टीकोन यांबरोबरच रुग्णांच्या कल्याणासाठी असलेले आमचे अतूट समर्पण या बाबींमधूनहातांवरील शस्त्रक्रियेची मानके पुन्हा परिभाषित होतीलआपल्या समाजाला सुलभ पद्धतीचीउत्तरदायित्व सांभाळणारी आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत असाच हा आमचा नवीन विभाग सुरू करण्याचा उपक्रम आहे.”

‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे हे प्रगत हात शस्त्रक्रिया केंद्र डेक्कन जिमखाना, नगर रस्ता आणि हडपसर येथील शाखांमध्ये कार्यरत असेल. विशिष्ट परिस्थिती असलेल्या रुग्णांसाठी मदत गटांची सत्रे, जनजागृतीच्या योजना व रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी सहयोगी स्वरुपाचे प्रयत्न अशा स्वरुपाची कामेही या विभागातर्फे करण्यात येतील.

‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चा ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन अॅडव्हान्स्ड हँड सर्जरी’ हा नवीन विभाग सहकार्य, कौशल्य, करुणा, विश्वास आणि सुलभ आरोग्यसेवा यांद्वारे रुग्णांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे. या हँड सर्जरी विभागामध्ये शल्यचिकित्सक, पुनर्वसन तज्ज्ञ आणि बहु-अनुशासनात्मक तज्ज्ञ यांचा चमू सतत तत्पर असणार आहे. सातत्यपूर्ण प्रगती, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि इष्टतम उपचार करण्यासाठी विस्तार या पद्धतीने भविष्यात काम करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.

‘इंटरनॅशनल रिस्ट सेंटर्स’ (आयडब्ल्यूसी) आणि ‘एशिया पॅसिफिक रिस्ट असोसिएशन’चे ‘रिस्ट आर्थ्रोस्कोपी’साठीचे मान्यताप्राप्त सेंटर ऑफ एक्सलन्स या संस्थांनी नियुक्त केलेले ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे सेंटर फॉर एक्सलन्स इन अॅडव्हान्स्ड हँड सर्जरी’ हे एकमेव केंद्र आहे.

हात आणि मनगटाच्या शस्त्रक्रियेमध्ये विशेषज्ञ बनू इच्छिणाऱ्या देशातील व परदेशातील डॉक्टरांना या केंद्रातून फेलोशिप प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रगत हँड सर्जरी विभागाचा शुभारंभ करून ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’ने आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या सीमा पार करण्यासाठी आणि समाजाला उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठीची बांधिलकी दर्शविली आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच हातांचे आरोग्य, आजारांस प्रतिबंध व विशेष उपचार घेण्याची संस्कृती वाढवण्यासाठी रुग्णालयातर्फे सर्व भागधारकांना आमंत्रित करण्यात येत आहे.

हात शस्त्रक्रिया दिनानिमित्त आणि प्रगत हात शस्त्रक्रिया विभागाच्या शुभारंभाच्या निमित्ताने, सह्याद्रि हॉस्पिटलने ‘सेव्ह द वर्किंग हॅंड’ आणि ‘हॅंड इन हॅंड – सेव्ह द ग्रोईंग हॅंड’ या दोन मोहिमा सुरू केल्या आहेत.

‘सेव्ह द वर्किंग हॅंड’ (काम करणारा हात वाचवा) या उपक्रमात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व प्रौढांच्या हाताच्या दुखापती आणि ब्रॅचियल प्लेक्ससच्या दुखापतींसाठी सर्वसमावेशक उपचार यांवर भर देण्यात येईल. या मोहिमेद्वारे जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे आणि हाताला झालेल्या दुखापतीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत करणे हे सह्याद्री हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे.

‘हँड इन हँड-सेव्ह द ग्रोइंग हँड’ (हातात हात – वाचवा वाढता हात) या उपक्रमात लहान मुलांच्या हातात असणारे दोष, विसंगती यांची दखल घेण्यात येईल, तसेच ऑब्स्टेट्रिक ब्रॅचियल प्लेक्सस पाल्सी यांवरही लक्ष केंद्रित करण्यात येईल. आंतरविद्याशाखीय प्रयत्नांच्या माध्यमातून शिक्षण आणि संरचित संदर्भ प्रणालींद्वारे या परिस्थितींचे व्यवस्थापन करण्याचे आणि रुग्णांवरील परिणाम सुधारण्याचे सह्याद्री हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे.