20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या ट्रेलरने जिंकली प्रेक्षकांची मने

Share Post

हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. सोमवारी रात्री या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर लगेच हा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला आणि अवघ्या काही तासांतच प्रथम क्रमांकावर ट्रेंड होत, तो वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला. केवळ मराठीच नाही तर इतर भाषांतील ‘हर हर महादेव’च्या ट्रेलरलाही असाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्युबवर अवघ्या काही तासांतच वीस लाखांच्यावर व्ह्युज मिळाले असून ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड करण्यात यशस्वी झाला.

तामिळ चित्रपटसृष्टीत मक्कल सेल्वन म्हणजे सामान्य लोकांचा नायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार विजय सेथुपती यांनीही या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर आपल्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला, जो अनेक जणांनी रिट्विटही केला आहे. सुबोध भावे यांनी अतिशय समंजसपणे साकारलेली शिवाजी महाराजांची करारी बाण्याची भूमिका आणि दमदार व्यक्तिमत्व असलेल्या शरद केळकर यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेचं दर्शन या ट्रेलरमधून होत असून या दोन्ही अभिनेत्यांना प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. अंगावर शहारा आणणारे लढाईचे दृश्य आणि त्याच्या जोडीला त्याच ताकदीच्या संवादांनी विस्मयकारक अनुभव दिल्याच्या प्रतिक्रिया अनेकजण समाजमाध्यमांवर देत आहेत.सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.