29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

सौरभ बाळासाहेब अमराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

सौरभ बाळासाहेब अमराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

Share Post

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सौरभ बाळासाहेब अमराळे उपाध्यक्ष पुणे शहर युवक काँग्रेस यांच्या शुक्रवार पेठ येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ नेते अरविंद शिंदे शहर अध्यक्ष काँग्रेस, , उल्हासदादा पवार, मोहन जोशी, रमेश बागवे,बाळासाहेब अमराळे,मितेंद्र सिंग, राहुल शिरसट, प्रविण करपे, प्रतिभा शिंदे तसेच काँग्रेस कमिटी पुणे शहराचे पदाधिकारी, पुणे शहर युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पटोले म्हणाले की सौरभ अमराळे यांनी कोरोनाच्या महामारीच्या काळात ५१ हजार ७०० लोकांना लसीकरण केल्याबद्दल विशेष अभिन्नदन त्याच बरोबर आरोग्य सुविधांवर भर, महिला सक्षमीकरण, जेष्ठ नागरिकांना सुविधा त्यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले की गेल्या १५ वर्षांपासून सौरभ अमराळे हे काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्याच बरोबर त्यांचे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहे.

सौरभ अमराळे म्हणाले की सामान्य जनतेच्या ध्यास घेऊन जनसेवेचा माणूस आपल्या हक्काचा यानुसार माझी वाटचाल सुरू आहे. लोकसेवा ही अखंडपणे मी सुरू ठेवेन. गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवून लाभ त्यांना मिळवून देण्याचा माझा कायमस्वरूपी प्रयत्न राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील अमराळे यांनी केले तर आभार बाळासाहेब अमराळे यांनी मानले.