NEWS

सुरक्षित शहरासाठी फायर इव्हॅक्युएशन सोल्यूशन महत्त्वाचे

Share Post

महाराष्ट्रातील विकसनशील शहरांमध्ये अलीकडेच झालेल्या आगीच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, सरकार आणि अग्निसुरक्षा तज्ञ सुधारीत मार्गदर्शक तत्वे तयार करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलत आहेत. यामध्ये उंच इमारतीमध्ये लोकांच्या जलद सुटकेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, येथील रामी ग्रँड हॉटेलमध्ये बुधवारी बचाव कार्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अत्याधुनिक फायर इव्हॅक्युएशन लिफ्टसंदर्भात तज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात स्पार्टन फायर इव्हॅक्युएशन लिफ्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम मेहता, अग्नीसुरक्षा आणि बचावकार्य तज्ज्ञ डॉ.दीपक मोंगा, तांत्रिक विक्री तज्ज्ञ नितीन पाटील सहभागी झाले होते.आगीच्या अपघातांदरम्यान अतिउंच इमारतीतील रहिवाशांना वाचवणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब असते. अशा इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट हा एक प्रतिबंधात्मक उपाय प्राणघातक आगीच्या अपघातांमध्ये जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळू शकतो.देशातील सात प्रमुख शहरांपैकी पुण्याने घरांच्या विक्रीत तिमाही-दर-तिमाही सर्वाधिक 13 टक्के वाढ नोंदवली आहे. 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत 14,100 निवासी युनिट्स विकली गेली असून, पहिल्या सात शहरांमध्ये एकूण घरांच्या विक्रीत पुण्याचा वाटा 16 टक्के होता. घरांच्या विक्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना पुण्यातील सर्वच उंच इमारती आगीपासून सुरक्षित आहेत का? आग लागण्याची घटना घडल्यास तिथे लोकांच्या सुटकेसाठी योग्य यंत्रणा, व्यवस्था आहे का? असा प्रश्न गांभीर्याने पुढे येतो आहे.दिवाळीतच पुणे अग्निशमन दलाने 17 आगीच्या अपघातांची नोंद केली आहे. ही संख्या खूप मोठी आहे. लोकांचा जीव आणि त्यांच्या स्वप्नातील घर वाचवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक किंवा विकसकांनी कोणतीही खबरदारी घेतलेली नाही,असे या घटनांवरून दिसून आले आहे.याबाबत प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे फायर इव्हॅक्युएशन मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. विक्रम मेहता म्हणाले, “ आपत्कालीन परिस्थितीत उंच इमारतींमधून लोकांना वेळेत बाहेर काढण्यासाठी कोणत्याही अग्निशमन दलाच्या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट. अग्निशमन दलाच्या जवानांसाठी वरच्या मजल्यावर जलद आणि सुरक्षितपणे पोहोचणे महत्त्वाचे असते. जेणेकरून ते तिथे अडकलेल्या लोकांना वेळेत बाहेर काढू शकतात तसेच आग विझवून अनेकांचे जीव आणि स्वप्नातले घर दोन्ही वाचवू शकतात. यासाठी ही फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये वापरलेले प्रगत तंत्रज्ञान ६० सेकंदात एखाद्या व्यक्तीला बाहेर काढू शकते. फायर इव्हॅक्युएशन लिफ्टमध्ये असेलेली इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) प्रणाली आगीच्या अपघातांदरम्यान इमारतीतील अग्निसुरक्षा प्रणाली , सुरक्षा तुकडी, लिफ्ट ऑपरेटर आणि जवळच्या अग्निशमन दल कार्यालयाला सतत संदेश पाठवून माहिती देईल. यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना कमीतकमी वेळेत व सुरक्षितपणे आग लागलेल्या मजल्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते. महाराष्ट्र ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचें पालन करून बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवल्यास उंच इमारतींमधील रहिवासी खरोखरच सुरक्षित राहू शकतात.अग्निसुरक्षा तज्ञ डॉ. दीपक मोंगा म्हणाले, “२० जुलै २०२२ हा आमच्यासाठी आयुष्य बदलणारा दिवस होता कारण महाराष्ट्र ऊर्जा विभागाकडून ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवण्याबाबत सल्ला देण्यात आला होता. शिंदे सरकारच्या काळात हे दूरदर्शी पाऊल उचलण्यात आले. फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट हे नवीन पीपीई अर्थात ‘सार्वजनिक संरक्षण उपकरण’ मानले जाते. जे आगीच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना वेळेवर बाहेर काढण्यासाठी वेळेत पोहोचते आणि त्यामुळे जीव आणि मालमत्ता वाचवणेही शक्य होते. फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची रचना फायर लिफ्ट मानकांनुसार केली गेली आहे. याची केबिन ज्वलनशील नसलेल्या सामग्रीपासून बनलेली आहे आणि याचे पॅनेल सिरॅमिक लोकरीने भरलेले आहेत.जे दोन तासांपर्यंत आगीपासून संरक्षण करू शकतात. आता अग्नीसुरक्षित भविष्य काळासाठी नवीन उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अनिवार्य आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *