29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगद्वारे भारत मोटर स्पोर्ट्समध्ये इतिहास रचणार 

Share Post

सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या पटलांमध्ये एक क्रांतिकारी अशी झेप घेत आपल्या उद्घाटनीय हंगामाद्वारे इतिहास रचण्यासाठी सुसज्ज आहे. भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या विश्वात एका नवयुगाची सुरुवात करणारी ही बहूप्रतीक्षित स्पर्धा पुण्यातील म्हाळूंगे भागातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे या हंगामातील केवळ एक पहिली स्पर्धा नाही तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे; कारण जगात पहिल्यांदाच फ्रेंचायझीवर आधारित होणारी जागतिक स्तरावरील सुपरक्रॉस स्पर्धा भारत आयोजित करत आहे. हे अभूतपूर्व असे क्रीडा संघ (लीग) वेग, कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा यांचे रोमांचकारी प्रदर्शन करत पुण्यातील या उद्घाटनीय समारंभाची सुरुवात करतील.

    २८ जानेवारी २०२४ रोजी आयएसआरएल (ISRL) आपल्या पहिल्या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील प्रसिद्ध सुपरक्रॉस दिग्गजांना एकत्र आणत आहे. हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी आजच आपल्या कॅलेंडरवर तारीख चिन्हांकित करून ठेवा!

    सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) चे सहसंस्थापक आणि संचालक श्री. ईशान लोखंडे आपला उत्साह व्यक्त करत म्हणाले, सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) केवळ एका स्पर्धेविषयी नाही, तर हा भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या पटलाला नवे रूप देण्यासाठीचा एक प्रवास आहे. उद्घाटनीय स्पर्धेमध्ये ४८ स्पर्धक असतील ज्यामधील जवळपास ८०% स्पर्धक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. यावरून सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) बाबत जगात असलेले आकर्षण आणि त्याचे स्थान प्रतीत होते. जगात पहिल्यांदाच ही अशी फ्रेंचायझीवर आधारित जागतिक स्तरावरील सुपरक्रॉस स्पर्धा होत असून या अनुषंगाने भारताला सुपरक्रॉसच्या विश्वात केंद्रस्थानी आणण्याचे आमचे ध्येय आहे.

    नुकत्याच झालेल्या चालकांच्या लिलावात जगभरातील वेगवेगळ्या १०० चालकांच्या नोंदणीसह लीग जागतिक स्तरावर गाजली असून त्यापैकी ४८ चालकांना सीअॅट आयएसआरएल (CEAT ISRL) च्या सहा फ्रेंचायझी संघांमध्ये स्थान मिळाले आहे. यामुळे आता हा कार्यक्रम जबरदस्त स्पर्धात्मक होणार हे निश्चित. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (FMSCI) द्वारा मान्यताप्राप्त असलेले सीअॅट आयएसआरएल (CEAT ISRL) हे सुपरक्रॉसच्या जगात गेम चेंजर बनण्यासाठी कटिबद्ध आहे.

सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) चे सहसंस्थापक आणि संचालक श्री. वीर पटेल म्हणाले, सीअॅट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने मोटरस्पोर्ट्सच्या जगात एक आदर्श प्रस्थापित केला आहे आणि हा उद्घाटनीय समारंभ एक गेम चेंजर बनण्यासाठी सज्ज आहे. या ऐतिहासिक स्पर्धेसाठी तयारी करत असताना, हे लीग केवळ स्पर्धेबाबत नाही, तर प्रतिभा, उत्साह, उत्कटता आणि स्पर्धेची चुरस यांचा हा उत्सव आहे. सुपरक्रॉससाठी जागतिक केंद्र बनण्याच्या उंबरठ्यावर भारत असताना या प्रवासात अग्रस्थानी असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.

    ही स्पर्धा चार थरारक भागात होणार आहे: ४५०सीसी आंतरराष्ट्रीय चालक, २५०सीसी आंतरराष्ट्रीय चालक, २५०सीसी भारत-आशिया मिक्स आणि अत्यंत स्पर्धात्मक असा ८५ सीसी कनिष्ठ वर्ग. चालकांची वैविध्यपूर्ण क्रमवारी (लाइनअप) विशिष्ट वर्गाच्या दुचाकींवरील त्यांचे कौशल्य प्रदर्शित करेल. प्रत्येक श्रेणी अद्वितीय अशी आव्हाने आणि उत्साह व जल्लोषाची हमी देईल.

    संपूर्ण मोटरस्पोर्ट्स विश्वाची नजर भारतावर असताना जल्लोषपूर्ण  जबरदस्त रेसिंग स्पर्धेचा उत्साह आणि  सुप्रसिद्ध तारकांचे संगीत यांसह

सीअॅट आयएसआरएल (CEAT ISRL) मोटरस्पोर्ट्सच्या एका नवयुगाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. लीगची बांधिलकी ही केवळ धावपट्टींपुरती मर्यादित नसून त्या पलीकडे विस्तारलेली आहे. समुदायाबाबत वचनबद्धता,  कौशल्यविकसन आणि पर्यावरणीय शाश्वतता यावर भर देत आम्ही ही एक सांस्कृतिक घटना बनवित आहोत.

    दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या तीन प्रतिष्ठित शहरांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सीअॅट आयएसआरएल (CEAT ISRL) सज्ज आहे आणि केवळ हृदयाचा ठोक चुकविणारे सुपरक्रॉस अॅक्शनच नाही तर प्रसिद्ध तारे व तारकांचे संगीत कार्यक्रम देखील यावेळी पाहायला मिळेल, जो  एक अतुलनीय असा मनोरंजनाचा अनुभव निर्माण करेल.

    सीअॅट आयएसआरएल (CEAT ISRL) च्या पहिल्या हंगामाचे वेळापत्रक, चालकांच्या लिलावाचे व संघ निवडीबाबतचे तपशील याबाबत अधिक माहितीसाठी कृपया आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://indiansupercrossleague.com/.