सावरकरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली सावरकर जयंतीनिमित्त आज सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. मोठ्या संख्येने सावरकर प्रेमींनी दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत, महेश आठवले, प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. सविता केळकर, मिलिंद कांबळे, शाहीर हेमंत माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना सन १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये रहात होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे या ठिकाणी जतन करण्यात आले आहे.