सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ चे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन
कशिश प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ आणि लहान मुलांसाठी ‘RISING STAR’ या फॅशन शोचे आयोजन येत्या ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. या फॅशन शो च्या माध्यमातून दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती कशिश प्रॉडक्शन्सचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ झालेल्या या पत्रकार परिषदेला पुण्याचे ‘पॅड मॅन’ योगेश पवार, दीपाली कांबळे, अर्चना माघाडे, रूपा पवळे, पीया कोसुंबकर आदि उपस्थित होते.
फॅशन शो बद्दल योगेश पवार म्हणाले, आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबावत असतो. ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून आलेल्या नोंदणी मधून स्पर्धेसाठी निवड केली आहे. सौंदर्य स्पर्धा म्हटंले की सहभागांसाठी अनेक निकष लावले जातात. पण या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय, वजन, ऊंची याचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाही. ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असणार आहे. या Mr, Miss,Mrs. स्पर्धेसाठी कोणतीही वयोमार्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच RISING STAR या स्पर्धेत लहान मुलांचा सहभाग आहे.
‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ साठी परीक्षक म्हणून काशीश फॅशन स्टुडिओ ब्रँड ॲ्बेसेडर वैशाली भारद्वाज, अभिनेता प्रसाद खैरे, अभिनेत्री पूजा वाघ, प्रियांका मिसळ, अल्विरा मोशन च्या दीपाली कांबळे काम पाहणार आहेत. हा फॅशन शो येत्या ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे दुपारी १ वाजता होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.