23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

सामाजिक उपक्रमकर्ते आणि शी (SHG’s) चा सहभाग “गिव्हींग फॉर गुड” थीम

Share Post

वार्षिक आणि बहुप्रतिक्षित १५ वे  “यलो रिबन एनजीओ फेअर” (वायआरएनएफ)  पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीस येत असुन  या प्रदर्शनाचे आयोजन क्रिएटीसीटी (पूर्वीचा ईशान्य मॉल), येरवडा, पुणे येथे १६ ते १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत  होईल.

हा भव्य मेळावा सकाळी ११ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहील.

या १५ व्या यलो रिबन एनजीओ फेअरचे उद्घाटन नाबार्डचे जनरल मॅनेजर जी. एस राऊत आणि पारुल मेहता ( ट्रस्टी – ईशान्य फाउंडेशन) यांच्या हस्ते होईल. या वर्षीच्या १५ व्या आवृत्तीद्वारे आता उत्सवाच्या खरेदीची सुरुवात होईल,यात हाताने विणलेल्या कपड्यांपासून विविध प्रकारच्या साड्यांपर्यंत, डोकरा ज्वेलरीपासुन ते हाताने बनवलेल्या चपलांपर्यंत, शाल आणि स्टोल्स, विविध कलाकृती आणि वस्तु, ऑरगॅनिक कडधान्ये, ऑरगॅनिक मध आणि बरेच काही असेल. दर वर्षीप्रमाणे या वर्षी देखील शेतकर्यांची बाजारपेठ, स्मार्ट भेटवस्तू, आकर्षक कलाकृती लहान मुलांसाठी पपेट शो, स्टोरी टेलिंग, क्राफ्ट सेंटर्स आणि भरपूर काही असेल.

विविध आकर्षक वस्तु आणि मनोरंजनासोबतच येथे असल्ल ग्रामीण पद्धत्तीच्या, स्वादिष्ट, मसालेदार खाद्यपर्दार्थांचा देखील आस्वाद घेता येईल जसे की भाकरी, झुनका, बैंगण का भरता, कांदा भाजी, पुरण पोळी आणि बरेच काही .

संपूर्ण भारतातील १०० हून अधिक एनजीओ , शीज (SHGS), शेतकरी, सामाजिक उपक्रमकर्ते आणि कारागीर क्रिएटीसीटी येथील वातानुकूलित २०,००० चौरस फुटांच्या क्षेत्रात त्यांचे कार्य प्रदर्शित करतील. हा मेळावा १६ ते १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत क्रिएटीसिटी मॉल, येरवडा, विमानतळ रोड येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुला राहील.

अधिक माहितीसाठी  www.ishanyafoundation.org   ला भेट द्या. _____________