18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘सातारचा सलमान’ येणार ३ मार्चला

Share Post

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. टेक्सास स्टुडिओज प्रस्तुत, प्रकाश सिंघी निर्मित हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे प्रदर्शित होणार आहे. ‘स्पप्नं बघितली तरंच खरी होतात’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये सगळे कलाकार एका हूक स्टेपमध्ये दिसत आहेत. साताऱ्यामध्ये राहणाऱ्या एक सामान्य मुलाची ही कथा आहे, जो हिरो बनायचे स्वप्न बघतोय. त्याचे हे स्वप्न पुर्ण होते का, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.