20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

सह्याद्रि हॉस्पिटल्सने अतिशय दुर्मिळ फ्रोझन एलिफंट ट्रन्क सर्जरी यशस्वी करून महत्त्वाचा टप्पा पार केला

Share Post

वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी यश संपादन करत, सह्याद्रि हॉस्पिटल्सने फ्रोझन एलिफंट ट्रन्क ही गुंतागुंतीची सर्जिकल प्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. ही अनोखी आणि दुर्मिळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा करण्यात आली आहे. ५५ वर्षे वयाच्या महिला रुग्णावर करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये क्रोनिक एओर्टिक डिससेक्शन ठीक करण्यात आले, जे गेला बराच काळ दुर्लक्षिले गेले होते..


या रुग्ण महिलेला सुरुवातीला काहीच लक्षणे जाणवत नव्हती, सखोल तपासणी केल्यानंतर लक्षणे आढळून आली आणि क्रोनिक एओर्टिक डिससेक्शन झाल्याचे समजले. त्यामुळे एओर्टा (महाधमनी) मोठ्या प्रमाणात पसरली होती. सर्वसामान्यतः ती २५ ते ३० मिलीमीटर असते तर या केसमध्ये ती दुप्पट म्हणजे ६० मिलीमीटर इतकी झाली होती. गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेऊन डॉ. स्वप्नील कर्णे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने विस्तारलेली एओर्टा बदलण्यासाठी आणि प्रॉक्सिमल डिसेंडिंग एओर्टा ठीक करण्यासाठी फ्रोझन एलिफंट ट्रन्क प्रक्रिया करण्याचे ठरवले.
फ्रोझन एलिफंट ट्रन्क प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एओर्टा बदलली जाते, यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश असतो. या केसमध्ये रुग्ण महिलेची संपूर्ण रक्ताभिसरण संस्था तात्पुरती जवळपास २० मिनिटे थांबवण्यात आली होती आणि त्या वेळेत आवश्यक ग्राफ्ट्स इम्प्लांट करण्यात आले. या दरम्यान रुग्णाच्या मेंदूला सातत्याने रक्तपुरवठा होत राहावा यासाठी एक अँटीग्रेड सेरेब्रल पर्फ्यूजन तंत्र वापरण्यात आले. ही सर्जरी कित्येक तास सुरु होती, त्यामध्ये कमालीचा अचूकपणा आणि उच्च कुशल विशेषज्ञांच्या टीमची गरज होती. या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा घटक, फ्रोझन एलिफंट ट्रन्कची किंमत खूप जास्त असते. पण हा एक टिकाऊ उपाय आहे आणि भविष्यात काही उपचार करण्याची गरज पडली तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येऊ शकतो.