17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

समीर वानखेडेंबद्दल क्रांती रेडकर म्हणाली…

Share Post

नुकताच जगभरात महिला दिन साजरा झाला. याच दिनाचे औचित्य साधत यावेळी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये अतिशय हुशार आणि संवेदनशील अशा दोन अभिनेत्रींनी हजेरी लावली. या दमदार अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे. अभिनेत्री, दिग्दर्शिका, उद्योजिका अशा विविध माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी क्रांती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असते. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठया गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी ती उलगडत असते. मात्र क्रांतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून तिच्या चाहत्यांना माहित नाही. तिच्या आणि समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील असेच काही सिक्रेट्स या टॉकशोमध्ये तिने उघड केले आहेत. यावेळी तिने श्रीशांतसोबत जोडल्या गेलेल्या नावाच्या मागे काय तथ्य आहे, याचाही खुलासा केला आहे. तिने एक भयाण गोष्टही सांगितली, तिला अनेकदा सोशल मीडियावर मारण्याच्या धमक्याही येतात. मात्र अशा धमक्यांना ती काय प्रतिउत्तर देते, हे आपल्याला हा एपिसोड पाहिल्यावर कळेल. या टॉक शोमध्ये क्रांतीसोबत तिची खास मैत्रीण उर्मिला कोठारेही आहे. प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास मानणाऱ्या उर्मिलाने यावेळी प्रेमात जर या दोन्ही गोष्टी मिळत नसतील तर दुसरं प्रेम शोधावं, असे धाडसी मतही व्यक्त केले. क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारेनी भरपूर गप्पा मारल्या असून या टॉकशोमध्ये त्या खूप धमालमस्ती करताना दिसत आहेत, प्रेक्षकांना हा एपिसोड प्लॅनेट मराठी ओटीटीवर कोणतेही शुल्क न आकारता पाहता येईल.