सद्गुरू शंकर महाराजांच्या दर्शनासाठी भारताची स्टार खेळाडू मनिका बात्रा
इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४मध्ये गुरुवारी बंगळुरू स्मॅशर्सने पहिल्या विजयाची नोंद केली होती. त्यांचा पुढील सामना पुणेरी पलटन यांच्याशी होणार आहे. भारताची अव्वल खेळाडू मनिका बात्राच्या अविश्वसनीय खेळाच्या जोरावर बंगळुरू स्मॅशर्सने ८-७ अशा फरकाने गतविजेत्या चेन्नई लायन्सचा पराभव केला होता. हिच लय कायम राखण्याचा संघाचा मानस आहे.
आगामी सामन्याआधी मनिका बात्रा आणि तिची आई यांच्यासह पुनित बालन ग्रुपचे प्रमुख व संघामालक श्री पुनित बालन यांनी शनिवारी श्री सदगुरु शंकर महाराजांच्या मठाला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले.
भारताची टॉपची खेळाडू मनिका बात्राने गुरुवारी सुतिर्था मुखर्जीवर मात करून विजयी पुनरागमन केले होते. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ सुरू आहे. मनिकाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बंगळुरू स्मॅशर्सने पहिल्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.