29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड 

Share Post

पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबचे अधिकृत पत्र दिले.All India Journalist association चे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली All India Journalist association च्या पुणे शहर / जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही ते काम पाहत आहेत. या कार्याची दाखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी राज्य संपर्क प्रमुख पदी म्हणून सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नेमणूक केली आहे. सागरराज  बोदगिरे हे गेली १० वर्ष सिद्धांत मीडिया अँड पब्लिसिटी या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्रात  काम करीत आहेत. तसेच वृत्तपत्र, डिजिटल या माध्यमात देखील ते कार्यरत आहेत. 

संपर्क प्रमुख पदभार सांभाळल्या नंतर महाराष्ट्रातील शहर , ग्रामीण भागातील पत्रकारांना संस्थेशी जोडण्याचे आपले ध्येय असल्याचे सागरराज बोदगिरे यांनी सांगितले.