20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार ‘आपडी-थापडी’चा खेळ

Share Post

सहकुटुंब आनंद घेता येणारा “आपडी-थापडी’

चित्रपटाचं पोस्टर लाँच, दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या “आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.चित्रपटाचं छायांकन सुमन साहू यांचे आहे. चित्रपटाचं पोस्टर फील गुड असल्याने “फॅमिली चा चित्रपट बघा फॅमिली बरोबर” अशी टॅग लाईन असल्याने हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि सहकुटुंब पाहता येईल यात शंका नाही .

श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकिर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. “बाजी” आणि “पोस्टर बॉईज”या चित्रपटांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं आपडी-थापडी नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे.