बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात होळीनिमित्त १२५ किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. सुमधूर काळी व पिवळी द्राक्षे संपूर्ण गाभारा व दत्तमहाराजांच्या मूर्तीच्या मागे लावण्यात आली होती. भाविकांना ही आरास पुढील दोन दिवस पाहण्यासाठी खुली राहणार आहे.