20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम यांची मानाची दहीहंडी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम यांची मानाची दहीहंडी

Share Post

पुणे / प्रतिनीधी : आकर्षक विद्युत रोषणाई, डिजेने वाजविलेले आकर्षक संगीत, तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. सुमारे वीस ते पंचवीस हजार तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर कसबा पेठेतील भोईराज दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भव्य दहीहंडी मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळा जवळ उभारण्यात आलेल्या आकर्षक झुंबरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. त्यावर एलईडीने केलेली विद्युत रोषणाईमुळे उत्सवाचे वेगळेपण आधोरेखीत होत होते. एलईडी लाईट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखीन आकर्षक करत होते.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल, अध्यक्षा जान्हवी धरीवाल – बालन, सिनेअभिनेते शरद केळकर, हार्दिक जोशी, प्रवीण तरडे, विशाल मल्होत्रा, अभिनेत्री सोनल चव्हाण, अक्षया देवधर आदी उपस्थित होते.
रात्री बरोबर दहा वाजता कसबा पेठ येथील भोईराज दहीहंडी संघाने ही दहीहंडी फोडत तब्बल 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस आणि ट्राफी मिळविली.
यावेळी बोलताना उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, दोन वर्षानंतर झालेला हा महोत्सव सर्वांना मनातून आनंद देणारा ठरला आहे. यामुळे आलेली मरगळ दूर झाली असून आगामी काळात पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.