29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

श्रीकृष्ण सांस्कृतिक मित्र मंडळाकडून गणेशोत्सव उत्साहात साजरा

श्रीकृष्ण सांस्कृतिक मित्र मंडळाकडून गणेशोत्सव उत्साहात साजरा

Share Post

कोरोनामुळे गेली दोन वर्ष सण उत्सव करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते परंतु यावर्षी सर्वत्र सर्व उत्सव अगदी धूमधडाक्यात होत आहेत.आंनदनगर सनसिटी रोड वरील श्रीकृष्ण सांस्कृतिक मित्र मंडळाकडून देखील या वर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यंदा या गणेश मंडळाचे १८ वे वर्ष आहे. नुकताच गणेश मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश नाकेर यांचा वाढदिवस झाला तो त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यां समवेत आजोळ वंचित मुलांचे आश्रम वडगाव येथे शालेय वह्या, पुस्तके, शाळेला उपयोगी वस्तू, धान्य वाटप करून अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष सूरज ठाकूर,कार्याध्यक्ष मंगेश जाधव,सेक्रेटरी अनिकेत कानगुडे,ज्येष्ठ सभासद दिनेश भट्ट कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते. मंडळाकडून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असतात. यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश नाकेर यांनी व्यक्त केले.