शेफलर इंडियाने दुसऱ्या वार्षिक सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची घोषणा
शेफलर इंडिया लिमिटेडने (बीएसई: ५०५७९०, एनएसई:
SCHAEFFLER) आपला वार्षिक उपक्रम सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची
घोषणा केली आहे. च्या सहयोगाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम शेफलार इंडियाच्या
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत राबवण्यात येत आहे. समाजातील महत्त्वपूर्ण
समस्यांचे निवारण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सोशल इनोवेशन्सना
वाढवण्यासाठी, पाठिंबा देणे हा याचा उद्देश आहे.
गेल्या वर्षी या उपक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली आणि शेफलरने समुदायांमध्ये
सकारात्मक परिवर्तन घडवून आणतील अशा नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून त्यांना
चालना देण्याचे मिशन सुरु केले.
पर्यावरणात्मक शाश्वततेपासून तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक उपाययोजना पर्यंत
विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय नावीन्य दर्शवणाऱ्या १० विजेत्यांची निवड यंदाच्या वर्षीच्या
१३० प्रवेशिकांमधून करण्यात आली. पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे दृष्टिकोन
अनोखे आहेत. सामाजिक नावीन्य आणि उद्यमशीलता यांच्या इकोसिस्टिमला चालना
देण्याप्रती शेफलर इंडियाची वचनबद्धता या प्रकल्पांमधून दिसून येते.
पुरस्कारांसाठीच्या ज्युरीमध्ये शेफलर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पॅनलचा समावेश होता.
शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम आणि शेफलर इंडियाचे
व्हाईस प्रेसिडेंट – एचआर आणि हेड – सीएसआर श्री शंतनू घोषाल ज्युरीचे अध्यक्ष होते.
करो संभवचे संस्थापक, प्रसिद्ध सामाजिक उद्योजक श्री. प्रांशू सिंघल हे देखील यावेळी
उपस्थित होते.
