29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

शेतकरी कुणबी मराठा संघाच्या वतीने आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप

Share Post

कङूस (ता.खेड) पोशिदरा येथिल ठाकर आदिवासी बांधवांना शेतकरी कुणबी मराठा संघाच्या वतिने दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले.
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आदिवासी समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शेतकरी कुणबी मराठा संघ, सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. खेड तालुक्याततील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे. 
यावेळी मराठा- कुणबी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब कड, माजी उपसरपंच पंडित मोढवे, स्कोडा कंपनीचे मॅनेजर प्रसाद डुकरे, कोहिनूर अकडमीचे डायरेक्टर अनिल ठोंबरे, उद्योजक विकास साबळे, मेजर संदीप मेदनकर आदी सह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.