18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

शिवकालीन मर्दानी खेळ आणि लाईट साउंड शो मधून साजरा झाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव

Share Post

तलवारबाजी, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ, लाईट अँड साउंड शो आणि ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी’ या मालिकेतील कलाकारांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला.

या भव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे, संचालक, जय भवानी सहकारी बँक लिमिटेड , नवदीप तरुण मंडळ, शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी हेमंत रासने मा.अध्यक्ष स्थायी समिती,प्रसिद्धी प्रमुख भाजपा हेमंत लेले, मा.नगरसेवक धीरज घाटे, मा.नगरसेवक पल्लवी जावळे, भाजपा मा. विरोधी पक्ष नेते सुहास कुलकर्णी, प्रमोद कोंढरे-अध्यक्ष कसबा मतदारसंघ, ऍड. मंदार जोशी राष्ट्रीय निमंत्रक आर पी आय, भाजप सरचिटणीस राजेंद्र काकडे,मा. नगरसेवक योगेश समेळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण,अरविंद कोठारी लक्ष्मण आबा तरवडे , नवदीप तरुण मंडळ, शिवशक्ती प्रतिष्ठान, प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व व्यापारी आघाडी संघटना सदस्य आदि उपस्थित होते.

यावेळी मर्दानी खेळ त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ यांनीं सादर केले तर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील बहिर्जी नाईक ( अजय तापकिरे) , हिरोजी फर्जद ( रमेश रोकडे), सिद्धी खेरत ( विश्वजित फडते) , अनाजी पंत ( महेश कोकाटे), ज्योत्येजी ( गणेश लोणारे) आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे. या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त आयोजकांनी अनाथांना अन्नदान केले.