Daily UpdateNEWS

शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळरावांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू

Share Post

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदारसंघात आता प्रचार वेग घेत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे.  या लोकसभा निवडणूकीत आढळराव पाटील यांना जिंकून आणण्यासाठी कोंढवा खुर्द येथील पारगे नगर मधील सिटी लॉन्स मध्ये महा गठबंधन बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीत आपआपल्या परिने नागरिकांमध्ये पोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे विविध मान्यवरांनी  आपली मते व्यक्त केली. शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळरावांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू

अजित पवारांनी भाजप व एकनाथ शिंदे गटाला मदत केल्याने कोंढवव्यातील दादा समर्थकांनी आता दादाचे आदेश पाळणार असल्याचे सांगत आढळराव पाटलांना निवडून आणण्याचा निश्चय व्यक्त केला. 

सदरील कार्यक्रमात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक गफूर पठाण, मनसेचे माजी नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका नंदा लोणकर, इसहाक पानसरे, समीर शफी पठाण, नईम शेख मंडपवाले, संजय लोणकर, व इतर मान्यवर उपस्थित होते. आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून आणणार असा देखील सुर त्या बैठकीत ऐकायला मिळाला.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळरावांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू
शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळरावांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू