NEWS

शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल 32 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

Share Post

शिक्षकदिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने भारती विद्यापीठ (संचलित) कोथरूड येथील शंकरराव मोरे विद्यालयात शिक्षण घेतलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांचा दहावीचा वर्ग तब्बल 32 वर्षांनी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स येथे भरला. तत्कालीन शिक्षकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक विद्यार्थीही आठवणीत रममाण झाले. यावेळी दैवतासमान शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामुळे तत्कालीन शिक्षक भारावून गेले. हीच आमच्या शैक्षणिक क्षेत्रात कामाची पावती असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण अमेरिका व महाराष्ट्रातून माजी विद्यार्थी आले होते.शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने शंकरराव मोरे विद्यालय माजी विद्यार्थी संघ 1991 व इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स यांच्या संकलपेनेतून 1991 मध्ये दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पुन्हा दहावीचा वर्ग भरवला आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आला.  माजी विद्यार्थ्यांचा 32 वर्षांनी दहावीचा वर्ग इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स येथे भरविण्यात आला.

यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक एकनाथ दांडगे, भाऊसाहेब निकम, मधुकर पाटील, स्मिता सातपुते, बनसाडे सर, विलासराव पवार, अरुंधती महाम्बरे, नितिन म्हेत्रे, सुवर्णा माने, सुचित्रा वाळुंज, स्नेहलता पवार यांचा सनमन करण्यात आला . माजी विद्यार्थी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (आयओपी)चे संचालक प्रोफेसर प्रमोद जाधव  यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात सन्मानाने कार्य करत असल्याचे सांगितले. यावेळी प्रमोद कदम, रावसाहेब दगडेपाटील, राहूल जोशी, शाम दरेकर, मंगेश वाळवे, अजय सातकर (अमेरिका), अभिजित हांडे, बालवडकर, प्रदीप क्षिरसागर, धनंजय पाटील, शंकर ठाकूर, मुनेश्‍वर केंदळे, संतोष धुमाळ, संदीप कुंबरे, अनिल कोठावले, प्रमोद शिंदे, सुरेश राऊत, दिनेश बराटे, विराज कुचेकर, गणेश ढमाले, उदय राऊत, अनिल धोत्रे, अंनत भोंगाडे, शैलेद्र सनप, रविंद्र माने, राहुल दगडे, सुनिल मांजरे आदी  माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *