शहरी झोपडपट्टीमधील महिलांना महिला प्रिमियर लीगमधील सामना पाहण्याची संधी
मुंबई येथे सुरु असलेल्या महिला प्रिमियर लीगमधील सामन्याचा आनंद घेण्याची संधी आज शहरी झोपडपट्ट्यांमधील महिलांना मिळाली. अदानी उद्योग समूहाची शाखा असलेल्या अदानी फौंडेशनच्या वतीने शनिवारी ही अभिनव कल्पना राबविण्यात आली. या निमित्ताने झोपडपट्ट्यांमधील ५० महिलांना ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगीबेरंगी वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. गुजरात जाएंटस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्धच्या या सामन्यासाठी या महिला ब्रेबॉर्नवर उपस्थित होत्या. भव्य स्टेडियममध्ये प्रथमच उपस्थित राहून सामना पाहण्याची संधी मिळाल्याने या महिला उत्साहीत झाल्या होत्या. या पाहुण्या महिलांच्या उपस्थितीने सामन्याचे महत्व अधिक वाढले. अदानी समूहाच्या अदानी स्पोर्टसलाईनने महिला प्रिमियर लीगमधील गुजरात जाएंटस संघाची खरेदी केली आहे. संघाच्या सल्लागार मिताली राज यांनी फ्रॅंचाईजीच्या या कल्पनेचे स्वागत केले. खेळाच्या दरम्यान डगआईटमधून आम्हाला महिलांचा आवाज ऐकू येत होता. जेव्हा आम्ही आजूबाजूला पाहिले तेव्हा आमच्या स्टॅंडमध्ये काही अत्यंत प्रतिभावान महिला उपस्थित असल्याचे जाणवले. चेहऱ्यावर एक हास्य उमटले. महिलांची उपस्थिती पाहून संघातील प्रत्येक जण हरखून गेला होता. झोपडपट्ट्यांमधील महिलांना या खेळासाठी आमंत्रित करण्याची कल्पना खरंच हृदयस्पर्शी होती. आजची संध्याकाळ कायम आठवणीत राहिल, अशी प्रतिक्रिया मिताली राज यांनी व्यक्त केली. अदानी स्पोर्टलाईनबद्दलअदानी स्पोर्टसलाईन ही अदानी समूहाची एक वैविध्यपूर्ण क्रीडा शाखा आहे. ही शाखा बंदरे, उर्जा, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक पॉवर निर्मिती, ट्रान्समिशन, खाणकाम, विमानतळ ऑपरेशन्, नैसर्गिक वायू आणि अन्न प्रक्रिया अशा क्षेत्रांमध्ये काम करते. या शाखेची २०१९ मध्ये स्थापना झाली. तळागाळात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे आणि भारतातून भविष्यातील विजेते निर्माण करण्याचे व्यापक तत्वज्ञान अदानी स्पोर्टसलाईनकडे आहे. समूहाच्या राष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक जागतिक दर्जाची इकोसिस्टिम तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच ही कंपनी क्रीडा प्रतिभेचे पालनपोषण करताना क्रीडा अर्थव्यवस्थेला गती देते आणि एक अग्रगण्य क्रीडा राष्ट्र घडविण्याच्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावते.