NEWS

वी फाऊंडेशन आणि एरिक्सनने वंचित विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण कौशल्ये प्रदान करून सक्षम बनवण्यासाठी पुण्यामध्ये रोबोटिक लॅब केली सुरु

Share Post

चौथ्या औद्योगिक क्रांतीची नांदी सुरु झाली आहे. भविष्यातील आपले मनुष्यबळ केवळ डिजिटल युजर बनून न राहता डिजिटल मेकर बनावे यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यासाठी तयार असलेले कुशल प्रतिभावंत निर्माण होण्याची सुरुवात शालेय स्तरापासूनच व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, वी चा सीएसआर विभाग वी फाऊंडेशनने एरिक्सन इंडियाच्या सहयोगाने पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सयाजीनाथ महाराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्याधुनिक रोबोटिक लॅब सुरु केली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मिळून दहा रोबोटिक लॅब्स तयार करण्याचे वी फाऊंडेशनने ठरवले आहे आणि त्यापैकी पहिली लॅब आज पुण्यात सुरु करण्यात आली. या डिजिटल लॅबचे औपचारिक उद्घाटन एरिक्सनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ कस्टमर युनिट, वेस्ट इंडिया अमरजीत सिंग यांनी केले. यावेळी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे क्लस्टर बिझनेस हेड – महाराष्ट्र व गोवा रोहित टंडन उपस्थित होते.यावेळी वी फाऊंडेशनने एका ग्रंथालयाचे देखील उद्घाटन केले आणि आपल्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील निवडक विद्यार्थ्यांचा सत्कार केला.या डिजिटल लॅबमध्ये रोबोटिक किट्स, थ्रीडी प्रिंटर, लॅपटॉप्स आणि एक प्रोजेक्टर उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या जगाचा पहिला अनुभव घेण्यात मदत करण्याच्या दृष्टीने ही डिजिटल लॅब डिझाईन करण्यात आली आहे. शिक्षणाचा रोचक अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करून आणि सांघिक भावना, समस्या निवारण कौशल्ये आणि समीक्षात्मक विचार यासारखी कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित करून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांमध्ये शिक्षण व रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा करवून आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर व वी फाऊंडेशनचे डायरेक्टर श्री. पी बालाजी यांनी या उपक्रमाबाबत सांगितले, “समाजाच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे हा आमच्या सामाजिक विकास उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. पुण्यामध्ये सुरु करण्यात आलेली आमची डिजिटल लॅब शालेय मुलांना कोडिंग आणि रोबोटिक्सचा अनुभव मिळवून देईल, त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, समीक्षात्मक विचार यांना प्रोत्साहन देईल, त्यांच्या व देशाच्या उज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारे, संधींचे खूप विशाल विश्व त्यांच्यासमोर खुले करेल.”सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिकण्याची, प्रगती करण्याची आणि इतरांसोबत स्पर्धा करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने जिज्ञासा, गुरुशाला आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती कार्यक्रम असे तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळे शिक्षण उपक्रम वी फाऊंडेशनकडून चालवले जातात.एरिक्सनचे व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स, वेस्ट इंडिया अमरजीत सिंह यांनी सांगितले, “भारतामध्ये ५जी सेवांची सुरुवात करून डिजिटल इंडिया व्हिजन साकार करण्याचा पाया घातला गेला आहे. भविष्यासाठी तयार मनुष्यबळ निर्माण करण्यात गुंतवणूक करणे हे महत्त्वाचे पहिले पाऊल आहे. रोबोटिक्स कोर्स अभ्यासक्रमामध्ये रोबोटिक्सच्या संदर्भात प्रोग्रामिंग लॉजिकची मूलभूत समज निर्माण करणे, मूलभूत कामे करण्यासाठी रोबोट तयार करण्यासाठी डिझाईन थिअरीचा वापर, स्ट्रिंग, बूलेन्स इत्यादी विविध डेटाटाईप्सचा वापर या घटकांवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष समोरासमोर तसेच व्हर्च्युअल प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील. ‘ट्रेन द ट्रेनर’ अर्थात शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या सर्वसमावेशक प्रोग्राममुळे भविष्यात हे लाभ समाजातील खूप मोठ्या वर्गापर्यंत पोहोचवण्यात मदत होईल.वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे शिक्षण व साक्षरता कार्यक्रम: वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने जिज्ञासा, गुरुशाला आणि शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यासारख्या अभिनव तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपक्रमांमार्फत १.६ मिलियनपेक्षा जास्त मुलांवर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *