विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर: १६ ते १९ मार्च दरम्यान आयोजन
विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस.आर.पी. एफ. मैदानावर दिनांक १६ ते १९ मार्च दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितलीया, संचालक प्रसन्न देसाई, रोहन नहार आणि हर्षवर्धन वाकोडे यांनी दिली. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील शृंगेरी श्रोती, समीक्षा वणवे, श्रेयस वाघ व पुर्वेश खंडेलवाल या विद्यार्थ्यांनी संयोजनामधे योगदान दिलेले आहे. जितेंद्र पितलीया म्हणाले,स्पर्धेमध्ये पुण्यातील १६ संघ, सातारा, बारामती व कोल्हापूर मधील १-१ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन १६ मार्च रोजी होणार आहे. बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८ ते २३ या वयोगटातील मुला-मुलींचा समावेश असणार आहे. यामध्ये मुलांचे आणि मुलींचे दोन्ही संघ सहभागी होतील. त्याचबरोबर १२० माजी विद्यार्थी मिळून ७०० हुन अधिक खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी भारतीय महिला बास्केटबॉल संघाची कर्णधार शिरीन लिमये, ॲथलीट प्रियंका चवरकर, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष अभय छाजेड, उपाध्यक्ष इंद्रकुमार छाजेड आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे यंदा १० वे वर्ष आहे. रविवारी सकाळी ८ वाजता दिव्यांग मुलामुलींचा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये पुण्यातील १९ महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन,सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डि. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोहगांव,डि. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी,एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड,प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,भारतीय कला प्रसारिणी सभा यांचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन चे ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर, अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सातारा, डी.वाय.पी.सी.ई.टी. कोल्हापूर,विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामती, स्कूल ऑफ आर्किटेक्चर सिंबायोसिस, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.