विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटना एकत्र
बाळासाहेब ठाकरे कलादालन पुणे येथे कॅट महाराष्ट्र च्या माध्यमातून व्यापारी प्रतनीधी यांची मीटींग आयोजित केली होती, या मीटींग मध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून काही ठोस निर्णय घेण्यात आले, एफडीआय च्या काही नियमांन मध्ये बदल करण्यात यावा तसेच लवकरात लवकर इ काॅमर्स पाॅलीसी सरकारने करावी ही मागनी कॅट संघटनेकडून करण्यात आली आहे असे राष्ट्रीय नहामंत्री प्रवीण जी खंडेलवाल यांनी सांगितले, तसेच भारत ई पोर्टल च्या माध्यमातून डिजीटल व्यवसाय करत ऑनलाईन व्यापार उद्योगात स्थानिक व्यवसाय वाढविण्या साठी कॅट संघटनेकडून सहकार्य मार्गदर्शन करण्यात येईल.
अन्नधान्य प्रशासन तसेच काटावेधमापण विभागाकडून व्यापारी वर्गाचे सोशण केले जात आहे, महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यात काटा रजिस्ट्रेशन व नूतनीकरण याची फी निम्म्याहून कमी आहे, आपल्या कडे फी तर जास्त आहेच तरीही तेवढ्या फी काम होत नाही,काटावेधमापण कायदा केंद्रसरकार असून ही असा फरक का ? , रेग्युलर फी पेक्षा ही तीन ते चार पट पैसे घेऊन काटावेधमापण चे काम केले जाते याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, या गोष्टींवर महाराष्ट्र कॅट च्या माध्यमातून सर्व जिल्हा अधिकारी व मा. मुख्यमंत्री तसेच अन्नधान्य विभाग मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे, जर या बाबत योग्य ती भुमीका घेतली नाही तर मात्र अंदोलनाची भुमीका घेतली जानार आहे, व्यवसाय करत असतात विविध विभागाचे परवाने लागतात या साठी प्रत्येक शासकीय विभागाकडून स्थानिक पातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात यावी या संघटना सुद्धा पुढाकार घेऊन सहकार्य करण्यास तयार आहे, असे काॅन्फरडेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स, कॅट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिनभाऊ दिनकर निवंगुणे यांनी सांगीतले,प्रत्येक मोठ्या शहराच्या बाजुल एक स्वतंत्र सुरक्षित लाॅजीस्टीक पार्क व्यापारी वर्गा साठी कॅट च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार, असे पुणे जिल्हा कॅट अध्यक्ष विकास मुंदडा यांनी सांगीतले,संतोष सोहनी मराठवाडा अध्यक्ष, विनोद पिंगळे बीड,संजय मोदानी ऊस्मनाबाद,नंदकिशोर तोष्नीवाल हिंगोली, संजय मंत्री औरंगाबाद विभाग उपाध्यक्ष, अश्वीनी जाधव , सपना राउत अकोला, धर्यशिल पाटील,रीजवान खान,उमेश यादव ,नवनाथ सोमसे, कार्यक्रम प्रस्थावना शहर अध्यक्ष सुनिल गेहलोत यांनी केली,अजित चंगेडीया यांनी स्वागत केले, महेंद्र व्यास यांनी आभार मानले.