NEWS

विद्यार्थ्यांपासून सीनियर सिटीजन्सच्या आयुष्यात मनःसामर्थ्य पेरणारा लाईफ कोच पंकज भडागे

Share Post

अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला स्वतःकडून काहीना काही अपेक्षा आहेत. मात्र, त्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. उलट त्या पूर्ण होतील की नाही? हा विचार करण्यातच आपला जास्त वेळ जातो. ‘चांगला विचार कर सगळं चांगल घडेल’, असे आपल्या घरातील आई – वडील, आजी-आजोबा सांगतात. मात्र आपण त्याकडे फारस लक्ष देत नाही, अन् नैराश्यात जातो. खरतर आपल्या यश – अपयशात आपल्या विचारांच्या शक्तीचा मोठा वाटा असतो. याची जाणीव करून देवून त्यांचे आयुष्य बदलण्याचे काम लाईफ कोच, माईंडसेट ट्रान्सफॉर्मेशन ट्रेनर पंकज भडागे गेली अनेक वर्ष करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास लाखांच्या वर लोकांमध्ये मनःसामर्थ्य पेरण्याचे काम केले आहे. एक ग्रामीण भागातून आलेला संकुचित  मुलगा ते लाईफ कोच व माईंडसेट ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट असा पंकज भडागे यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. पंकज भडागे हे BSc computer केल्यानंतर धुळ्याहून पुण्याला आपल्या भावाकडे आले होते. मात्र गावाकडून शहरात आल्याने असलेला संकोच आणि इंग्रजीची भीती यामुळे त्यांनी अनेक मुलाखती देण्याचे टाळले. शेवटी आई परत धुळ्याला घेवून गेल्यावर त्यांना त्यांची चूक कळाली व ते पुन्हा पुण्यात आले. जेथे त्यांना बोलायची भीती वाटत होती, तेथे त्यांनी बोलण्याच्या क्षेत्रात अर्थात कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. त्यानंतर मर्क्स लाईन या शिपिंग कंपनीत विविध पदांवर नोकरी केली. या नोकरीतील १४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या उत्तम संवाद कौशल्याच्या जोरावर अनेक देशात काम केले. भारतात परतल्यावर २०१७ मध्ये त्यांनी माईंडसेट ट्रान्सफॉर्मेशन करण्याचे काम केले. आतापर्यंत त्यांनी १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून,पोलीस दल, कारागृहातील कैदी, बाल सुधारगृह, कंपन्या, ट्रेनर, सीनियर सिटीजन्स यांना मार्गदर्शन केले आहे.                  आपल्या प्रवासाविषयी बोलताना लाईफ कोच पंकज भडागे म्हणाले, पूर्वी मला बोलायची भीती वाटायची आज मी अनेकांना मोटिवेट करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी जे विचार केले; ते मनाच्या शक्तीने सत्यात आकर्षित होताना अनुभवले.जिथे बोलायची भीती वाटत होती, तिथे पहिली नोकरी ही कॉल सेंटरमध्ये लागली. त्यानंतर ज्या कंपनीचा विचार केला त्या मर्क्स लाईन या शिपिंग कंपनीत नोकरी लागली. आयटी चा असून सुद्धा कॉल सेंटर, फायनान्स, IT, प्रोजेक्ट मॅनेजर, इनोवेशन एक्सपर्ट म्हणून काम केले. प्रत्येक ठिकाणी शिकण्याची व काम करण्याची वृत्ती ठेवली. इंग्रजीची भीती असताना देखील १४ वर्षांच्या नोकरीत परदेशात काम केले. माझं शेवटच पोस्टिंग फिलिपींन्समध्ये असताना बायकोने ‘माईंड पॉवर’चा वर्कशॉप केला. आणि तिने मला ‘ट्रेन द ट्रेनर’ हा कोर्स करण्यासाठी सुचवलं. त्यानंतर मी परत भारतात आलो. माईंड पॉवर टूल्स वापरले. २०१७ मध्ये MPower Mindset Transformation ही consultancy सुरू केली. आतापर्यंत मी एक लाखा हुन अधीक जणांना मार्गदर्शन केले आहे. पारंपरीक पद्धतीने मार्गदर्शन करण्यापेक्षा innovative idea वापरून गाईड करण्याकडे माझा कल असतो. Dialogue with the Devil(नकारात्मक मनाचा इंटरव्हिव), mind sanitization ही सेशेन्स  त्याचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे तरूण पिढीला ते अधिक भावते. अनेक परदेशी नागरीकही माझे सेमिनार अटेंड करतात. उद्योजकांसाठी मी मेंटॉर म्हणून देखील काम करतो असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *