वाकड येथे “फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम’चे अनावरण
फिनिक्स मिल्स लि. तर्फे वाकड येथे “फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम” सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. खरेदी, भोजन आणि मनोरंजनासाठी पुण्यातील सर्वांत मोठे केंद्र सर्वांसाठी खुले करण्यात आले असून, पुणे आणि शेजारच्या शहरांतील रहिवाशांनाही खरेदीचा अनोखा अनुभव देण्यासाठी हा मॉल सज्ज आहे.
१६ एकर जमिनीवर पसरलेला १२ लाख चौरस फूटाचा भव्य मॉल खरेदीचा नावीन्यपूर्ण अनुभव देणारे ३५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आयनॉक्स, फन पार्क, टाईम झोन आणि फनसिटी सारख्या आकर्षणांसह एक लाख चौरस फुटांवरील मनोरंजन क्षेत्र ७५ हून अधिक फूड अँड बेव्हरेजेस पर्याय पुण्याची समृद्ध संस्कृती व वारसा यांचा कॉस्मोपॉलिटन हबशी अनोखा मेळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १० हजारांहून अधिक व्यक्तींसाठी रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा.आणखी १४ लाख चौरस फूट जागेवर कार्यालये उभारण्याची योजना, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पूर्णत्वाला जाण्याची अपेक्षाफिनिक्स मिल्स लि. (PML), या देशातील अग्रगण्य डेस्टिनेशन रिटेल मॉल डेव्हलपर आणि ऑपरेटरने येथील आपला दुसरा मॉल “फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम ” सुरू केला आहे. हा भव्य मॉल १६ एकर जागेवर उभारण्यात आला असून, १२ लाख चौरस फूटापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील दुकाने, कार्यालये भाडेतत्वावर देण्यात आली आहेत… फिनिक्स मिल्स लि. ने कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डच्या (CPP Investments) सहकार्याने संयुक्त उपक्रमांतर्गत हा मॉल विकसित केला आहे. देशातील आघाडीचा मॉल विकसक असणाऱ्या या कंपनीने देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये १२ ठिकाणी फिनिक्स मॉल्स उभारले असून, सुमारे १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळावरील जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.द फिनिक्स मिल्स लि.चे अध्यक्ष अतुल रुईया म्हणाले, “२००६ मध्ये, आम्ही पुण्यातील विमाननगर या पूर्वेकडील भागात जागा मिळवून या क्षेत्रातील आमच्या वाटचालीला सुरुवात केली. २०११ मध्ये फिनिक्स मार्केटसिटी मॉल कार्यान्वित झाला आणि आमच्या पोर्टफोलिओमध्ये एक रत्न म्हणून त्याने आपले स्थान प्रस्थापित केले.