वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित वरद प्रॉपर्टी फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद
वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित वरद प्रॉपर्टी फेस्टिवल १५ व १६ ऑक्टोबर २०२२ रोजी डीपी रोड, पंडित फार्म्स पुणे येथे आयोजित करण्यात आले होते . पुण्यात शुक्रवारी , १४ ऑक्टोबर रोजी अत्यंत जोरदार ,ढगफुटी समान पाऊस झाला
त्यामुळे या वस्तू प्रदर्शनावर पावसाचे सावट होते . वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स या एक्सपो मध्ये दोन दिवस सुदैवाने पाऊस पडला नाही याचा फायदाघेत या प्रदर्शनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला .
या प्रदर्शनात पुण्यातील प्रथिथयश बांधकाम व्यवसायिकां बरोबरच प्लॉटींग प्रोजेक्ट्स सुद्धा होते.
प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे दुबई व पटाया येथील प्रॉपर्टी सुद्धा विदेशातील गुंतवणूक पर्याय म्हणून होत्या . या प्रॉपर्टी फेस्टिवल चे आकर्षण पुणेकरांना होतेच आणि काही दिवस उत्सुकतेमुळे या प्रदर्शना बद्दल चांगली चर्चा होती .
पुणेकरांनी या एक्स्पोला पावसाळी वातावरणात सुद्धा फार उत्तम प्रतिसाद दिला . सर्व प्रोजेक्ट्स स्टॉल धारकांना म्हणजेच बांधकाम व्यवसायिकांना उत्तम ग्राहक वर्ग मिळाला अनेक साईट व्हिझीट आणि स्पॉट बुकिंग सुद्धा झाल्या.

येणारा ग्राहक वर्ग हा प्रॉपर्टी घेण्यास उत्सुक असल्यामुळे एक्सपोला बिझनेस रिस्पॉन्स अपेक्षे पेक्षा फारच चांगला मिळाला. हीच चर्चा बिल्डर लॉबी मध्ये आजही आहे व हीच चर्चा तर होणारच या वर वरद टीम चा द्रुढ विश्वास होता जो ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद देउन सार्थ केला. चर्चा तर होणारच कारण २० लकी होम बायर्स जाणार आहेत दुबई ट्रिपला तेही वरद प्रॉपर्टी फेस्टिवल च्या यशस्वी सेलिब्रेशनसाठी ७० हुन अधिक बिल्डर आणि डेव्हलपर्स यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला व दोन दिवसाच्या या फेस्टिवल मध्ये त्यांनी अनेक लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले बऱ्याच लोकांना त्यांना त्यांच्या आवडीची जमीन अथवा प्लॉट सुद्धा मिळाला..या प्रॉपर्टी फेस्टिवलचे उदघाटन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.या वरद प्रॉपर्टी फेस्टिवलमध्ये वास्तुविशारद तज्ञ आनंद पिंपळकर यांनी वास्तूत प्रवेश करतांना वास्तू कशी असावी यावर वास्तुविषयक माहितीपूर्ण आनंदीवास्तु संगीतमय कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित ग्राहकांची प्रश्न उत्तरे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले.यावेळी वरद प्रॉपर्टीचे संचालक महेश कुंटे उपस्थित होते.