लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचा इंदिरा कल्याण केंद्राच्या खडकीभूषण पुरस्काराने सन्मान
इंदिरा कल्याण केंद्राच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना खडकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात गौरविण्यात आले. इंदिरा कल्याण केंद्राच्या मैदानात आयोजित करण्यात पुरस्कार वितरण समारंभात अभिनेत्री वृंदा बाळ, ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप देवकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. दुर्योधन भापकर, बाबा कांबळे, मेहबूब लियाकत शेख, मनिष आनंद, प्रदिप जांभळे, (पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, राष्ट्रपती पोलिस पदक विजेते), पूजा आनंद, अरिबा शेख (लंन्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड) यांना पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री निशा मोरे, अभिनेत्री टीना क्षत्रिय, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता टाकवणे, अभिनेत्री, स्नेहल वाल्हेकर, अल्ताफ दादासाहेब शेख (राष्ट्रीय पुरस्कार विजेते, लेखक/ दिग्दर्शक), अभिनेता आनंद बूरूड, जाकिर हूसेन आदींना खडकी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष समीर चौधरी, गणेश कांबळे, अजहर खान, रवि गायकवाड, तनवीर खान, हारुण सय्यद, फिरोज शेख, महेबूब पिरजादे, विजय गायकवाड, आकाश सर्वदे, सईद शेख, लतीफ सत्तार शेख यांनी केले होते.