Entertainment

लवकरच येणार ‘बेबी ऑन बोर्ड’

Share Post

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येत असतात. मग सुरु होतो तो नऊ महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘बेबी ऑन बोर्ड’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतिक्षा मुणगेकर, अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिरीजचे लेखन व दिग्दर्शन सागर केसकर यांचे असून साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते आहेत. तर अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’ या शीर्षकावरून आणि पोस्टरवरूनच यात काय धमाल आणि मनोरंजनात्मक किस्से असतील, याचा अंदाज येतोय. ‘बेबी ऑन बोर्ड’च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नाविन्यपूर्ण सिरीज घेऊन आले आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” बेबी ऑन बोर्ड नवीन संकल्पना असलेली सिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. उत्तम दिग्दर्शक व कलाकारांची साथ लाभली. आजच्या तरुणाईला आवडेल, जवळची वाटेल, अशी ही वेबसिरीज आहे. लग्नानंतरच्या या टप्प्यात जोडीदारासोबतच कुटुंबासोबतचे बाँडिंगही पाहायला मिळेल. ही प्रेमळ, हलकी फुलकी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *