लग्नाचा अनाठाई खर्च टाळून पुण्यातील वांजळे कुटुंबाचा दिव्यांग,निराधार व गरजवंतांला मदतीचा हात
सार्वजनिक जीवनातील स्वतःचे स्थान व नावलौकिक टिकवण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करून कौटुंबिक कार्यक्रम समारंभ मोठ्या तालेवारपणे साजरी करणारे मंडळी हल्ली जागोजागी दिसत असताना.
समाजापुढे एक आदर्श निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम काही चांगली माणसं करत असतात यापैकीच एक पुण्यातील आहिरे गावातील दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे यांचे कुटुंब.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ह.भ.प. शुक्राचार्य वांजळे यांनी आपले जेष्ठ बंधू दिवंगत सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ आपल्या मुलाचा चि. स्वप्निलचा विवाह..चि.सौ.का.सायली काळे यांच्याशी लग्न साधेपणाने करून एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.
लग्नासाठी खास पाहुणे होते ते म्हणजे दिव्यांग, दृष्टीहीन,निराधार आणि गरजवंत..
त्यांच्यासाठी स्टेजवर भेटवस्तू होत्या अपंगांसाठी स्कुटी, सायकली,व्हीलचेअर, जयपुर फुट, श्रवण यंत्रे आदि वस्तू..
या लग्नसमारंभातलं वेगळंपण होते ते म्हणजे पाहुण्यांची मर्यादित संख्या. कर्ण कर्कश डिजे – बॅंजो व मिरवणुक टाळून. दृष्टीहिनांचा दिव्यांगासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम.
या स्तुत्य आणि अनोख्या विवाह समारंभाप्रसंगी बोलताना श्री. शुक्राचार्य वाजंळे म्हणाले आमचे जेष्ठ बंधू दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून मुलाच्या लग्नाच्या माध्यमातून आपण ही अनोखी संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न केलाकेला आहे.