लग्जरी हाउसिंग प्रोजेक्ट्स “डिवाइन गार्डन” मध्ये खरेदी करा स्वप्नातले घर
घर खरेदी म्हणजे फक्त चार भिंतींच्या आत बंदिस्त झालेली जागा खरेदी करणे एवढेच नसते. विशेषत: श्रीराम असोसिएट्सच्या प्रकल्पात घर घेणारे ग्राहक एक स्टायलिश आणि खास अनुभव खरेदी करत असतो. श्रीराम असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राकेश अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोहन अगरवाल, रूचिका अग्रवाल उपस्थित होते.
पुढे राकेश अगरवाल म्हणाले, आम्ही पुण्याच्या लोहगाव परिसरात आमचा अत्याधुनिक लग्जरी हाउसिंग प्रोजेक्ट्स “डिवाइन गार्डन” घेऊन आलो आहोत ते ग्राहकांना घर खरेदी चा निर्णय एखाद्या समारंभा सारखा साजरा करता यावा ही इच्छा घेऊन! आमचे हजारो ग्राहक श्रीराम असोसिएट्स च्या प्रकल्पांना सर्वोच्च पसंती देतात. आता आम्ही पुण्याच्या नव्या युगाच्या ग्राहकांसाठी आमचा “डिवाइन गार्डन” हा गृहप्रकल्प घेऊन आलो आहोत. त्यांच्यासाठी आधुनिक सुखसोयींनी सज्ज असे घर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.
श्रीराम असोसिएट्स ने गेल्या 23 वर्षांच्या आपल्या वाटचालीत ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे.श्री राकेश अगरवाल म्हणाले की 1500 हून जास्त समाधानी परिवारांच्या आशीर्वादाने आम्ही 1 लाख 24 हजार चौरस फूट जागा नंदनवना सारखी विकसित केली आहे. आजघडीला श्रीराम असोसिएट्स 51 लाख चौरस फूट आकाराचे प्रकलप विकसित करत आहे, असे श्री राकेश अगरवाल म्हणाले. श्री अगरवाल म्हणाले की पुण्यासारख्या हॅपी आणि हापनिंग शहरात उभा राहणार असलेल्या “डिवाइन गार्डन” प्रकल्पाची एक खासियत म्हणजे विमानतळ हाकेच्या अंतरावर असणे. प्रकल्पात 2 बेडरूम आणि 3 बेडरूमचे फ्लॅट उपलब्ध आहेत. 12 एकर प्रशस्त जागेत 20 टॉवर, 10 सुविधा पार्क आणि 108 सार्वजनिक वापराच्या सोयीची व्यवस्था असेल. रुचिका अगरवाल या मान्यवर रुरो डिझाइन स्टुडिओ च्या आर्किटेक्ट ने डिव्हाइन गार्डन ची संपूर्ण वास्तुरचना केली आहे.