18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन्स इंडिया तर्फे ‘रोश चिल्ड्रन्स वॉक’ चे आयोजन

Share Post

रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन्स इंडिया प्रा. लिमिटेड तर्फे आज रोश ‍चिल्ड्रन्स वॉक या जगभरांतील सर्वांत मोठ्या सामाजिक उपक्रमांपैकी एकतसेच रोशची जगभरांतील सामाजिक प्रकल्पांनाआणि मुलांना सहकार्य करण्याच्या परंपरेचा भाग असलेल्या उपक्रमाचे आयोजन केले होते.  चिल्ड्रेन्स वॉक च्या माध्यमातून सहभागी झालेल्या लोकांकडून जगभरांतील व  स्थानीय प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन हजारो मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात येतो.

पुण्यातील वॉकचे आयोजन हे कै. व्ही.आर. रुईया मूकबधीर विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांसह त्यांच्या मदतीसाठी करण्यात आले होते आणि यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन्स इंडिया प्रा. लिमिटेड च्या कर्मचार्‍यांसह १०० लोकांनी भाग घेतला होता. दीड तासाच्या या फेरीची सुरुवात शाळेपासून झाली आणि ही फेरी पर्वतीहून पुन्हा शाळेत आली

रोश च्या कर्मचार्‍यां कडून उभारण्यात आलेल्या रकमे इतकीच रक्कम रोश कडून जमा करण्यात येणार असून ही रक्कम शाळेला त्यांच्या ऑडिओमीटर आणि स्पीच ट्रेनर या गरजा पूर्ण करण्यासाठी देण्यात येणार आहे.  या उपक्रमामुळे सध्या शाळेत शिकत असलेल्या ११०  मुलांना बोलण्याचे आणि ऐकण्याचे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.

ऑडिओमीटर मुळे मुलांची ऐकण्याची क्षमता शोधून काढता येते जेणेकरुन यामुळे नंतर त्या मुलावर कोणते उपाय करणे योग्य आहे ते शोधता येते. स्पीच ट्रेनर हे एक असे उपकरण आहे ज्यामध्ये मुलाची ऐकण्याविषयीची गरज लक्षात घेऊन त्यानुसार समायोजन करता येते आणि त्याच बरोबर मायक्रोफोनचा उपयोग करुन प्रशिक्षणही देता येते.

या वॉक मध्ये सहभागी होतांना रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन्स इंडिया प्रा. लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक राजा जमलमडका यांनी सांगितले “ रोश चिल्ड्रन्स वॉक चे यशस्वी आयोजन हे जगभरात गेल्या २० वर्षांपासून केले जात आहे.  या उपक्रमामुळे आंम्हाला आमच्या समाजाला काहीतरी परत देण्याची आठवण करुन दिली जाते आणि त्याच बरोबर मुलांसाठी आरोग्यपूर्ण आणि सक्षम भविष्य निर्माण करण्यातही आमचे योगदान दिले जाते.म्हणूनच आम्ही केवळ आर्थिक मदतीवर भर न देता आमच्या कर्मचार्‍यांना या मुलांबरोबर त्यांचा वेळ देण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.” ते पुढे म्हणाले “ आंम्हाला आनंद होत आहे की कै. व्ही.आर. रुईया मूकबधीर विद्यालयातील मुले आज आमच्या बरोबर आली आणि आंम्हाला याचा अधिक आनंद होतो की आज आम्ही जो निधी उभारला आहे त्याचा उपयोग शाळा आता  मुलांची बोलण्याची  आणि ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी करु शकेल.”

रोश इन्फॉर्मेशन सोल्युशन्स इंडिया प्रा. लिमिटेड  हे रोशचे   “हेल्थकेअर डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स” केंद्र आहे.