29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

रॉयलओक फर्निचर च्या रिटेल स्टोअर चे वाघोली (पुणे) येथे उद्घाटन

रॉयलओक फर्निचर च्या रिटेल स्टोअर चे वाघोली (पुणे) येथे उद्घाटन

रॉयलओक फर्निचर च्या रिटेल स्टोअर चे वाघोली (पुणे) येथे उद्घाटन

Share Post

भारतातील आघाडीची फर्निचर कंपनी रॉयलओक ने आज वाघोली येथेत्यांच्या पहिल्या फ्लॅगशिप स्टोअरचे
उद्घाटन केले. रॉयलओक च्या या स्टोअर मध्ये ग्राहकांना सोफा, रिकलायनर्स, डायनिंग, एक्स्क्लुझिव्ह मट्रेसेस,
बेड्स, कुशन्स तसेच ऑफिस आणि आऊटडोअर फर्निचरची भारतीय बाजारपेठेतील संपूर्ण रज उपलब्ध होणार
आहे.

वाघोली (नगर रोड) येथील पहिल्या स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुण्या सई ताम्हणकर (भारतीय
अभिनेत्री) यांनी सांगितले “ हे स्टोअर खूपच विशाल आहे आणि यामध्ये स्टाईल आणि आरामदायकपणा
दोन्हीचे मिश्रण असलेले इम्पोर्टेड फर्निचर उपलब्ध आहे. या स्टोअर मध्ये लिव्हिंग, डायनिंग, बेड्स, ऑफिस
आणि आऊट डोअर फर्निचर चे विशाल कलेक्शन उपलब्ध आहे.” त्या पुढे हे ही म्हणाल्या की स्टोअरची
सुंदरता ही आहे की इकडे जगभरांतून आलेल्या फर्निचरची रेंज ही सर्वोत्कृष्ट किंमतीत उपलब्ध असल्यामुळे
संपूर्ण शहरांत याचे हे वेगळेपण जाणवते.”

(From L to R) Mr. Yatish Chandra, Head -Retail Royaloak Incorporation Pvt Ltd, Mr. Vijai Subramaniam Chairman of Royaloak, Indian Actress Sai Tamhankar along with Mr. J. P, Senior Marketing Manager of Royaloak at the inauguration of Royaloak 1st flagship showroom in Pune.

या कार्यक्रमात बोलतांना रॉयलओक चे चेअरमन श्री विजय सुब्रमणियन्‌ यांनी सांगितले “ रॉयलओक चे पहिले
ब्रॅन्ड स्टोअर सुरू करतांना आंम्हाला आनंद होत आहे, या स्टोअर मुळे आम्ही आमच्या निष्ठावंत ग्राहकांना
उत्पादनांचा अनुभव घेऊन आंतरराष्ट्रीय फर्निचर , होम अँक्सेसरीज आणि अशा अनेक गोष्टी उपलब्ध करुन देत
आहोत. भविष्यात आम्ही अशा प्रकारची आणखी काही स्टोअर सुरू करण्याची योजना आखली आहे.”

रॉयलओकचे रिटेल हेड श्री यतीश चंद्रा यांनी पुढे सांगितले “ अनुभवावर आधारीत खरेदी हे आमचे प्रमुख लक्ष्य
आहे, आमचे स्टोअर हे ब्रॅन्डचा अनुभव देण्यासाठी योग्य पध्दतीने डिझाईन करण्यात आले आहे . ब्रॅन्डचा
अनुभव समृध्द करण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट करु आणि ग्राहकांशी संभाषणाचे आम्ही महत्त्व जाणतो.
आंम्हाला खात्री आहे की याचा उपयोग होईल.”

*“ विशाल स्तरावर काम केल्याने आंम्हाला आता वाढीस जागा उपलब्ध झाली असून यामुळे ग्राहकांसाठी
वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध होणार आहेत. कंपनी ने नेहमीच ग्राहकांना अजोड किंमतीत आंतरराष्ट्रीय
स्तरावरील फर्निचर उपलब्ध करुन दिले आहे. स्टोअर मधील कर्मचार्याहना सुध्दा उत्पादने आणि ग्राहकांच्या
गरजांविषयी योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे, परिणामी स्टोअर मधील हा अनुभव खूपच समृध्द असेल.”
कंपनी कडून १० हजारांहून अधिक विविध प्रकारचे फर्निचर आयात केले जाते. रॉयलओक चे कर्नाटक,
तेलंगाणा, एपी, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि अन्य ठिकाणी १२८ हून अधिक
स्टिल आऊटलेट्स आणि २० वेअरहाऊस सुविधा उपलब्ध आहेत.

रॉयलओक विषयी-

रॉयलओक फर्निचर हा भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रॅन्ड आहे. या ब्रॅन्डचे बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली,
गुरूग्राम, मुंबई, कोलकाता, लखनौ, गुवाहटी, रायपुर आणि भारतातील अन्य शहरांमध्ये १९८ हून अधिक
स्टोअर्स आहेत. कंपनी कडून विविध मोड्स मध्ये जसे रिटेल, ऑनलाईन, होलसेल आणि फ्रॅन्चाईजी तत्वावर
काम केले जाते.

कंपनी ने नेहमीच क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी बनण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ग्राहकांची
जीवनशेली उंचावण्यासाठी ग्राहकांना परवडणार्या दरात उत्पादने उपलब्ध करुन देण्यावर कंपनीने भर दिला
आहे.

रॉयलओक मध्ये ग्राहकांना जगभरांतून आलेल्या फर्निचरची डिझाईन्स उपलब्ध होत असून यामध्ये होम, ऑफिस
आणि आऊटडोअर सह इम्पोर्टेड फर्निचरचा समावेश आहे. ग्राहकांमध्ये प्रसिध्द असलेल्या डिझाईन्स मध्ये
अमेरिका, टर्की, मलेशिया येथील डिझाईन्स लोकप्रिय आहेत आणि ही उत्पादने अतिशय योग्य किंमतीत
उपलब्ध आहेत. स्टोअर मध्ये ठेवण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये २००– सोफा सेट्स,१०० डायनिंग सेट, १००–
बेडरुम सेट आणि विशाल अशा ऑफिस तसेच आऊटडोअर फर्निचरच्या रेंजचा समावेश आहे.