20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

रितेश देशमुख यांचा आगामी चित्रपट ‘ वेड ‘ च्या पोस्टरचे अनावरण

Share Post

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटा द्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत .

या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे . आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर केली.