17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Share Post

संक्रांतीनिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे संपन्न झाला. यावेळी महिला पदाधिकारी व पुणे शहरातील विविध भागातून शेकडो महिलांनी आपली उपस्थिती लावली.

महिला अध्यक्ष प्रिया गदादे व युवती अध्यक्ष पूजा झोळे हस्ते उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू व वाण देण्याचा कार्यक्रम यावेळी करण्यात आला. महिलांनी मनोरंजनपर गाणी गायली तसेच सुवासिनींनी यावेळी उखाणे घेवून आपला आनंद साजरा केला. सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनीही गाणी गायली, त्यामुळे कार्यक्रमास वेगळाच आनंद निर्माण झाला होता. यावेळी शहरभरातील माजी नगरसेविका अश्विनी भागवत, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अर्चना चंदनशिवे, शालिनी जगताप, महिला कार्याध्यक्ष संगीता बराटे, पूनम पाटील,नूतन शिवरकर, उपाध्यक्ष नुरजहा शेख,वंदना साळवी,भावना पाटील, लावण्या शिंदे,विधानसभा महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, श्वेता होनराव,अनिता पवार, सुनीता डांगे, नीता गायकवाड, कार्याध्यक्ष स्मिता दातिर, महिला बचत गट अध्यक्ष अश्विनी वाघ,महिला सरचिटणीस वृषाली वांबूरे ओबीसी अध्यक्ष मोनिका काळे ,पद्मिनी ओसवाल, माधवी मोरे, सुवर्णा पवार,रेश्मा जाधव, विद्या यादव, लक्ष्मी साठी कविता पवार,वंदना साळवे, ज्योति शिर्के, प्रणाली गुंड , स्मिता दातीर, विजया भोसले, छाया पाटील, नसीम मिजवत, आशा जमदाडे, अंजली तांदळे, मंगल शिंदे, वैशाली निकम,सारिका बोत्रे,सानिया खान,महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.