23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

राष्ट्रवादी तर्फे महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन

Share Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने शहर सरचिटणीस रुहीसबा सय्यद यांनी महिला आरोग्य जागरूकता आणि महिला सक्षमीकरण या बाबत मार्गदर्शन व उपाय कार्यक्रमाचे हडपसर इरशत बाग, महमदवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १५० पेक्षा अधिका महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.
आजच्या काळात महिला वर्ग हा व्यवसाय नोकरी मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत,संसार सांभाळून कुटुंबासाठी त्यांची धडपड सुरू असते. मात्र आरोग्याकडे धावपळीत दुर्लक्ष होऊन अनेक रोगांच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना स्वत: ची काळजी घेण्याचे मार्गदर्शन आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे यावर चर्चा झाली. रुहीसबा सय्यद यांनी सांगितले,महिला आरोग्य जागृती – महिलांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलले जे दररोज महिला आर्थिक गरजा कमावण्यासाठी घराबाहेर काम करतात आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तसेच महिला स्त्रीरोग समस्या आणि महिला स्वच्छता यावर चर्चा करून त्यांना नैतिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मार्गदर्शन करणे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्याचे मार्ग, सॅनिटरी पॅडवर लाल चिन्हांकित करून सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावायची आणि सरकारी स्वच्छता कामगारांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
वक्ते ओबी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शालिनी विजय यांनी स्त्रीरोग जनजागृती आणि गर्भाशयाचा कर्करोग आणि इतर स्त्रीरोग समस्या जसे की PCOD, वंध्यत्व इत्यादींबाबत सर्व महिलांना माहिती देऊन चर्चा केली.
भगिनी हेल्पलाईन NCP च्या संचालिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या डॉ. सुनीता मोरे यांनी महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या उत्थानावर माहिती दिली. अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रुबीना जमदार यांनी महिला सक्षमीकरणबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी बस्ती येथून सुलताना शेख, मुन्नी शेख, हसीना सैफुद्दीन बारभुईया, सारिका ससाणे, अनिसा शेख, तबस्सुम शेख आदी महिला उपस्थित होत्या.