राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या मेळाव्यातरवींद्र धंगेकरांना पाठींबा
महाराष्ट्रात गेल्या ६-७ महिन्यात सत्तेच्या संदर्भात जी खालची पातळी गाठली गेली त्यामुळे राजकीय स्तर घसरल्याचे सर्वांना जाणवले आहे. अशावेळी सुशिक्षित समाजातील नागरिकांनी पुढे येऊन प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या उमेदवारास निवडून देण्याची गरज आहे. कसब्याचा चेहरा-मोहरा ते बदलू शकतील आणि त्यामुळेच कसबा मतदार संघातील जनता १०० टक्के त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास सर्वांना आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉक्टर सेलतर्फे रवींद्र धंगेकर यांना पाठींबा देत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे झालेल्या राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या डॉक्टरांच्या मेळाव्यात एकमताने ठरवण्यात आले. या मेळाव्यात सुमारे १०० हून अधिक स्त्री-पुरुष डॉक्टर्स उपस्थित होते. कसबा विधानसभा मतदार संघातील डॉक्टरांकडे येणारे अनेक पेशंट्स गेल्या २५ वर्षात भाजपाने कसब्याचा विकास केला नाही, मुलभूत नागरी सुविधांचा विकास केला नाही. अशा तक्रारी करताना दिसतात. कसब्यातील जुण्या वाड्यांचा प्रश्न बिकट असून अनुषंगिक बदल करून नवे कायदे करून वाड्यांच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न भाजपाने सोडविला नाही. हाच सूर अनेक पेशंटच्या बोलण्यात दिसून येत असतो असे अनेक डॉक्टर वक्त्यांनी नमूद करून म्हटले की, या सर्व पेशंटना कसब्यात बदल हवा आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या सुसंस्कृत उमेदवाराच्या विरुद्ध केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील मंत्री एकत्र ताकद लावत आहेत. यावरूनच धंगेकरांची लोकप्रियता दिसून येत असून त्यांना आम्ही निश्चित मत देणार असे पेशंट सांगतात असे अनेक डॉक्टरांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रारंभी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. शशिकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी आपल्या भाषणात सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे रवींद्र धंगेकर यांना पाठींबा देत असल्याचे सांगितले. याप्रसंगी उमेदवार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्व डॉक्टरांची भेट घेतली. या मेळाव्यात डॉ.परशुराम सूर्यवंशी, डॉ.सुनील होनराव, डॉ.शशिकांत कदम,

डॉ.सुनील जगताप, डॉ.हेमंत तुसे, डॉ.राजेश साठे, यांची भाषणे झाली. डॉ.नितीन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. फोटो ओळ- राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या मेळाव्यात डॉ.परशुराम सूर्यवंशी, डॉ.सुनील होनराव, डॉ.शशिकांत कदम, डॉ.सुनील जगताप, मोहन जोशी, रमेश बागवे, अरविंद शिंदे, डॉ.हेमंत तुसे, डॉ.राजेश साठे, डॉ.नितीन पाटील