राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला व युवती सेल तर्फे आयोजित महाभोंडल्यात पुणेकर महिलांनी जल्लोष करत लुटला आनंद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने महिला व युवती सेलच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आयोजित केलेल्या महाभोंडला आणि रास दांडिया कार्यक्रमात पारंपरिक वेशात महिलांनी चांगलाच ठेका धरला. या कार्यक्रमात पुणेकर महिलांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. मोठ्या उत्साहाने दांडिया खेळणारी, तितक्याच उत्साहाने ‘ऐलमा पैलमा.. , अशी गाणी म्हणत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. दत्तवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस महिला व युवती पार्टीतर्फे गणेशोत्सव काळात पुणे शहरातील महिलांसाठी घेतलेल्या गौरी सजावट व सेल्फी विथ गौरी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष प्रिया गदादे व युवती अध्यक्ष पूजा झोळे यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन केले होते.

सदर कार्यक्रमात शहराध्यक्ष दीपक मानकर, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सिने अभिनेते अमिताभ बच्चन फेम श्री. शशिकांत पडवळ, सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, गायक जितेंद्र भुरूक प्रमुख उपस्थिती होती. शशिकांत पडवळ, सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे, सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, गायक जितेंद्र भुरूक, शिवाजी गदादे पाटील, दत्ताभाऊ सागरे, प्रदीप देशमुख,विजय कदम, समीर चांदेरे, संतोष नांगरे, अच्युत लांडगे,प्रशांत कडू, शुभम माताळे, पूनम पाटील,भावना पाटील,गजानन लोंढे,
संतोष बेंद्रे,अजय दराडे,लावण्या शिंदे,श्वेता मिस्त्री,निकिता गायकवाड,प्रतीक्षा पिसाळ,श्रेया तांबे,
तृष्णा पाटोळे,पूजा जाधव,नयन गायकवाड,प्रणाली गुंड,सानिया खान तसेच पुणे शहर महिला कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सरचिटणीस, सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
